२.४६ लाख मतदारांचे फोटो नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST2021-06-20T04:07:56+5:302021-06-20T04:07:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघातील एकूण ४२ लाख ३० हजार ३८८ मतदारांपैकी २ ...

There are no photos of 2.46 lakh voters | २.४६ लाख मतदारांचे फोटो नाहीत

२.४६ लाख मतदारांचे फोटो नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघातील एकूण ४२ लाख ३० हजार ३८८ मतदारांपैकी २ लाख ४६ हजार ९२८ मतदारांचे फोटो मतदार यादीमध्ये नसल्याचे निदर्शनास आले आहे.

यादीत नसलेले फोटो जमा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या पत्त्यावर जाऊन फोटो जमा करण्याचे काम करीत आहेत. परंतु अनेक मतदार स्थलांतरित असल्याचे निदर्शनास आले असून, केंद्रस्तरीय अधिकारी स्थलांतरित मतदारांच्या घरी तीन वेगवेगळ्या दिवशी व वेगवेगळ्या वेळी जाऊन आले असून त्यावेळी अशा स्थलांतरित मतदार मतदार यादीवर दिलेल्या पत्त्यांवर आढळून आले नसल्यामुळे त्यांनी पंचनामा केला आहे. अशा मतदारांनी आपली छायाचित्रे ३० जूनपर्यंत केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

पंचनाम्याच्या याद्या तयार करुन त्या सार्वजनिक स्वच्छतागृह, तहसील कार्यालय, मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या nagpur.nic.in या संकेतस्थळावप्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या स्थलांतरित मतदारांच्या नावांची यादी संबंधित तालुक्यातील तसेच शहरातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना देण्यात आली आहे.

मतदार यादीतून नावे वगळणी करण्यात येणाऱ्या मतदारांची यादी nagpur.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून आपले नाव सदर यादीत नाही याची खात्री करुन घ्यावी. वगळणी करावयाच्या मतदारांचे नाव यादीत असल्यास मतदारानी आपला फोटो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे तात्काळ जमा करावा. सदर यादीतील मतदाराला आपण ओळखत असल्यास त्या मतदाराचा रंगीत फोटो तात्काळ संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावा. फोटो जमा करण्यासाठी दिनांक ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली असून विहित मुदतीत केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे फोटो जमा न केल्यास यादीतील मतदार स्थलांतरित आहे असे समजून त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल, याची संबंधित मतदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी केले आहे.

Web Title: There are no photos of 2.46 lakh voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.