Corona Virus in Nagpur; ‘कोरोना’मुळे संघाचे शिक्षा वर्ग नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 12:22 PM2020-04-07T12:22:33+5:302020-04-07T12:23:14+5:30

‘कोरोना’मुळे आलेले राष्ट्रीय संकट लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरातील सर्व संघ शिक्षा वर्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल ते जून या कालावधीतीत सर्व वर्ग रद्द करण्यात आले असल्याची माहिती सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी दिली आहे.

There are no classes in RSS because of 'Corona' | Corona Virus in Nagpur; ‘कोरोना’मुळे संघाचे शिक्षा वर्ग नाहीत

Corona Virus in Nagpur; ‘कोरोना’मुळे संघाचे शिक्षा वर्ग नाहीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’मुळे आलेले राष्ट्रीय संकट लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरातील सर्व संघ शिक्षा वर्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल ते जून या कालावधीतीत सर्व वर्ग रद्द करण्यात आले असल्याची माहिती सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी दिली आहे.

संघाच्या वेळापत्रकानुसार दरवर्षी उन्हाळ्याच्या कालावधीत देशभरात विविध वर्गांचे आयोजन करण्यात येते. यात प्राथमिक, प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष वर्गांचा समावेश असतो. तृतीय वर्ष वर्ग हा देशपातळीवरचा असतो व त्यात देशभरातील स्वयंसेवक सहभागी होत असतात. हे आयोजन केवळ नागपूरलाच होते. विशेष म्हणजे या वर्गांचे वेळापत्रक अगोदरपासूनच ठरलेले असते व त्याचे नियोजनदेखील मार्चपासूनच सुरू होते. ‘कोरोना’चे संकट असल्यामुळे संघ स्वयंसेवक सेवाकार्यात लागले आहेत. शिवाय एका जागी पाचहून अधिक लोक जमता येत नाहीत. देशात ‘लॉकडाऊन’ आहे व ‘कोरोना’वर नियंत्रण कधी येईल हे निश्चित सांगता येत नाही. अशा स्थितीत संघ शिक्षा वर्ग रद्द करण्याचाच निर्णय संघधुरिणांनी घेतला आहे.
एप्रिल ते जूनपर्यंतच्या वर्गांसोबतच या कालावधीत आयोजित सर्व सार्वजनिक व सामूहिक कार्यक्रमदेखील रद्द करण्यात आले असल्याचे डॉ. मनमोहन वैद्य यांनी स्पष्ट केले आहे.

मागील वर्षी निवडणुकांमुळे लांबला होता वर्ग

संघात तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्ग महत्त्वाचा मानला जातो. देशभरातील विविध प्रांतांमधील स्वयंसेवक यात सहभागी होत असतात. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात याची नागपुरात सुरुवात होते. मागील वर्षी लोकसभा निवडणुका असल्यामुळे तो वर्ग उशिरा सुरू झाला होता. दरम्यान, संघाची स्थापना १९२५ साली झाली. त्यानंतर संघावर बंदी आल्यानंतरचे वर्ष सोडून दरवर्षीच संघ शिक्षा वर्गांचे आयोजन होत आले आहे. यंदा मात्र ‘कोरोना’चा फटका बसल्याचे चित्र आहे.
 

 

Web Title: There are no classes in RSS because of 'Corona'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.