शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
3
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
4
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
5
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
6
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
7
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
8
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
9
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
10
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
11
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
12
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
13
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
14
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
15
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
16
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
17
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

कोविड रुग्णांसाठी नागपूर शहरात ५३ रुग्णालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 9:22 PM

शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या व रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारींची दखल घेत, महापालिकेने आवश्यक कार्यवाही करून शहरातील ५३ रुग्णालये रुग्णांसाठी उपलब्ध केली आहते. यात ६ शासकीय आणि ४७ खासगी रुग्णालयांचा समावेश आहे.

ठळक मुद्देमनपाच्या प्रयत्नाने ३,४३६ बेड्स उपलब्ध : गरजूंनी नियंत्रण कक्षाशी संंपर्क साधावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या व रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारींची दखल घेत, महापालिकेने आवश्यक कार्यवाही करून शहरातील ५३ रुग्णालये रुग्णांसाठी उपलब्ध केली आहते. यात ६ शासकीय आणि ४७ खासगी रुग्णालयांचा समावेश आहे.शासकीय रुग्णालयांत १,५१४ आणि खासगी रुग्णालयांमध्ये १,९२२ बेड्स असे एकूण ३,४३६ बेड्स कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी उपलब्ध झाले आहेत.या सर्व रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू असून येथे बेड्सच्या उपलब्धतेनुसार अतिजोखमीच्या रुग्णांना भरती केले जात आहे. कोरोबाधित रुग्णांना रुग्णालयांमधील बेड्सची स्थिती लक्षात यावी, यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष क्रमांक जारी करण्यात आला आहे. ०७१२ - २५६७०२१ या क्रमांकावर शहरातील रुग्णालयातील बेड्सची माहिती मिळेल. नागरिकांच्या सुविधेसाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष क्रमांकाच्या १० लाईन उपलब्ध करण्यात आल्या आहेत.नागरिकांना गरजेच्या वेळी अचूक माहिती मिळावी, त्यांची भटकंती होऊ नये यासाठी मनपातर्फे डॅशबोर्डसुद्धा तयार करण्यात आले असून यामध्ये सर्व खासगी रुग्णालयांद्वारे त्यांच्याकडील बेड्सची रिअल टाईम माहिती अपडेट केली जाते. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयामध्ये एक कोरोना मित्र नियुक्त करण्यात आला आहे. खासगी रुग्णालयांसंदर्भात कुठलीही तक्रार नागरिकांना असल्यास त्याची माहिती त्वरित कोरोना मित्राला देण्यात यावी, असे आवाहन महापौर संदीप जोशी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.प्रत्येक झोनमध्ये ५ रुग्णवाहिकाकोविड संदर्भात नागरिकांना जलद प्रतिसाद मिळून त्यांना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी झोनस्तरावर यंत्रणा बळकट केली आहे. कोरोनाबाधित रुग्णाला जलद उपचार घेता यावे यासाठी त्याच्या जवळच्या भागातून रुग्णवाहिका उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक झोनला प्रत्येकी ५ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.झोनस्तरावर नियंत्रण कक्षकोरोनावर प्रभावी नियंत्रण करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे क्षेत्रीय स्तरावर कोविड नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. कोरोनासाठी अधिकच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व पर्यवेक्षणासाठी संबंधित झोनच्या सहायक आयुक्तांना कोविड नियंत्रण कक्षाचे नोडल आॅफिसर नियुक्त केले आहे. गृह विलगीकरणात असलेल्या किंवा अतिजोखमीच्या रुग्णांना कोणताही त्रास होत असल्यास नागरिकांनी त्वरित संबंधित झोनच्या नियंत्रण कक्षामध्ये संपर्क साधावा.झोनस्तरीय कोरोना नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांकलक्ष्मीनगर- ०७१२ - २२४५०५३धरमपेठ -०७१२ - २५६७०५६हनुमाननगर - ०७१२ -२७५५५८९धंतोली -०७१२ -२४६५५९९नेहरुनगर -०७१२ -२७०२१२६गांधीबाग -०७१२ -२७३९८३२सतरंजीपुरा -मो.नं.७०३०५७७६५०लकडगंज -०७१२- २७३७५९९आशीनगर ०७१२ - २६५५६०५मंगळवारी -०७१२ - २५९९९०५केंद्रीय नियंत्रण कक्ष ०७१२ -२५६७०२१कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी तात्काळ अ‍ॅम्ब्युलन्स सेवाकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे बाधित रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे तात्काळ अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरु केली आहे. रुग्णवाहिकेसाठी टोल फ्री क्रमांक १०२ व १०८ यावर दूरध्वनी केल्यास तात्काळ अ‍ॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.कोरोनाबाधित रुग्णांसाठी टोल फ्री क्रमांक १०२ व १०८ या क्रमांकावर सुरू करण्यात आलेल्या अ‍ॅम्ब्युलन्स रुग्ण सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल