शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

...तर आयुक्तांच्या विरोधात न्यायालयात जाणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 8:01 PM

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या संचालक मंडळाची बैठक तातडीने बोलावून काम सुरू करावे, प्रकल्पग्रस्तांना मोबदला द्यावा, असे निर्देश देत याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरातील महत्त्वाकांक्षी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सीईओ पद बळकावले आहे. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम ठप्प झाले आहे. वर्क ऑर्डरची मुदत संपली. हा प्रकल्प गुंडाळण्याचा प्रयत्न सुरू आहे. संचालक मंडळाची बैठक तातडीने बोलावून काम सुरू करावे, प्रकल्पग्रस्तांना मोबदला द्यावा, असे निर्देश देत याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला.संदीप जोशी यांनी गुरुवारी भरतवाडा भागाचा दौरा करून स्मार्ट सिटीच्या कामाची पाहणी केली. यावेळी आ. कृष्णा खोपडे, गिरीश व्यास, प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, परिवहन सभापती बाल्या बोरकर, प्रदीप पोहाणे, स्मार्ट सिटीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.पूर्व नागपुरातील भरतवाडा, पारडी, पुनापूर या भागातील १७३० एकर परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्प उभारला जात आहे. एक हजार कोटीचा हा प्रकल्प आहे. यात केंद्र सरकारचे ५०० कोटी, राज्य सरकार २५० तर नासुप्रचा २५० कोटींचा निधी उपलब्ध करणार आहे. यातील केंद्र सरकारकडून १९६ कोटी, राज्य सरकारने १४८ तर नासुप्रने १०० कोटी दिले आहे. निधी उपलब्ध असतानाही या प्रकल्पाचे काम थांबविण्यात आले आहे.या प्रकल्पामुळे १ लाख १३ हजार लोकांना फायदा होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा एकात्मिक पद्धतीने मिळतील. रोजगारांच्या संधी निर्माण होतील. परिसरात २४ बाय ७ पाणीपुरवठा व परिसरात कार्यक्षम घनकचरा व्यवस्थापन होणार आहे. ५२ किलोमीटरचे रस्ते, २९ पुलांचे निर्माण, सात हजार एलईडी पथदिवे, मलनिस्सारण आदींचा समावेश आहे. मात्र जलकुंभ उभारण्याचे काम बंद आहे. ५२ कि.मी.पैकी फक्त १०.५० कि.मी. रस्त्यांचे काम करण्यात आल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन थांबलेहोम-स्वीट-होम प्रोजेक्ट २२२.०९ कोटींचे आहे. यात एक हजार प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, उत्कृष्ट दर्जाच्या सोयीसुविधा, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात येणार आहे. भरतवाडा, पारडी, पुनापूर या भागात प्रकल्पग्रस्तांसाठी १०२४ सदनिकांचे बांधकाम केले जाणार आहे. मात्र हा प्रकल्प थांबला आहे.बाधितांना मोबदला नाहीस्मार्ट सिटी प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. अनेक लोकांची घरे गेली. परंतु प्रकल्प बाधितांना अद्याप पूर्ण मोबदला मिळालेला नाही. तीन हप्त्यात ही रक्कम मिळणार होती. सुरुवातीचे दोन हप्ते देण्यात आले. तिसरा हप्ता आयुक्तांनी रोखल्याचा आरोप कृष्णा खोपडे यानी केला. स्मार्ट सिटीचे चेअरमन प्रवीण परदेशी यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यानुसार कार्यवाही झाली नसल्याचे खोपडे म्हणाले.

 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेSandip Joshiसंदीप जोशी