त्यांच्या ऑक्सिजन पुरवठ्याने वाचले अनेकांचे प्राण ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:08 IST2021-05-23T04:08:49+5:302021-05-23T04:08:49+5:30

राहुल लखपती नागपूर : काेराेना काळात नागरिकांना असंख्य प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागताे आहे. विशेषत: अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे लाेकांच्या ...

Their oxygen supply saved many lives () | त्यांच्या ऑक्सिजन पुरवठ्याने वाचले अनेकांचे प्राण ()

त्यांच्या ऑक्सिजन पुरवठ्याने वाचले अनेकांचे प्राण ()

राहुल लखपती

नागपूर : काेराेना काळात नागरिकांना असंख्य प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागताे आहे. विशेषत: अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे लाेकांच्या जीवावर बेतत आहे. कुठे रेमडेसिविरचा तुटवडा तर कुठे ऑक्सिजनची मारामार हाेत असल्याने अनेकांनी प्राण गमावले. अशा भीषण परिस्थितीत काही लाेक मात्र नि:स्वार्थ भावनेने गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी धावून जात आहेत. लाेकमंगल फाऊंडेशन ही अशाच संवेदनशील लाेकांची संघटना हाेय. संपूर्ण काेराेना काळात संघटनेच्या सदस्यांनी अनेक गरजू रुग्णांपर्यंत ऑक्सिजनचा नि:शुल्क पुरवठा करून अनेकांचे प्राण वाचविले आहेत.

चार तरुणांनी मदत पुरविण्यासाठी या फाऊंडेशनची स्थापना केली. यापूर्वी ग्रामीण भागातील महिलांसाठी काम करणाऱ्या या ग्रुपने काेराेना काळात गरजू रुग्णांच्या घरापर्यंत ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम सुरू केले. फाऊंडेशनचे सक्रिय कार्यकर्ते श्रीपाद बाेरीकर यांनी सांगितले, एप्रिल महिन्यात काेराेनाचा प्रकाेप वाढल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजनसाठी धावाधाव करताना पाहून अस्वस्थ वाटत हाेते. कमतरतेमुळे जिल्हा प्रशासनही हतबल झाल्याचे दिसून येत हाेते. अशावेळी आपल्या संपर्काची मदत घेऊन ऑक्सिजन पुरवठा सुरू करण्याचा निर्धार केला. आम्ही ऑक्सिजन निर्मात्यांकडे गेलाे व इतर संघटनांच्या मदतीने त्यांच्याकडून ऑक्सिजन सिलिंडर आणले. ऑक्सिजनची गरज असूनही रुग्णालयात बेड मिळाले नाही, अशांना पुरवठा सुरू केला. आमच्याकडे ६५ जम्बाे ऑक्सिजन सिलिंडर हाेते व ते गरजू रुग्णांच्या घरापर्यंत पाेहचविणे सुरू केले. गरज संपली की परत आलेल्या सिलिंडरमध्ये पुन्हा ऑक्सिजन भरून दुसऱ्यांना पुरविले. अशाप्रकारे या संपूर्ण काळात १४२ रुग्णांची मदत केल्याचे बाेरीकर यांनी सांगितले.

दुसरे सक्रिय सदस्य अमित खाेत म्हणाले, रुग्णांच्या घरापर्यंत पाेहचविण्यासह त्यांना लावून देण्याचे कामही केले. या काळात जिल्ह्यातील कामठी, कळमेश्वर, कन्हान, रामटेक आदी भागातूनही ऑक्सिजनसाठी काॅल आल्याचे त्यांनी सांगितले. या मदतीमुळे आंतरिक समाधान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. २४ बाय ७ तास काम करणाऱ्या या फाऊंडेशनमध्ये सचिन इंगाेले व विनाेद मुडे या सदस्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांनी अनेक रुग्णांचे प्राण वाचले, यापेक्षा वेगळी मानवसेवा असते ती काय.

त्रिवेणी ग्रुपने अबुधाबीवरून पाठविले १०० सिलिंडर

लाेकमंगल फाऊंडेशनने आंतरराष्ट्रीयस्तरावरही मदतीचे आवाहन केले. त्यानुसार यूएईच्या अबुधाबी येथे सक्रिय असलेल्या त्रिवेणी या सामाजिक ग्रुपने ऑक्सिजनचे १०० रिकामे सिलिंडर पाठविण्याचे मान्य केले. हुबेई अली बंदरावरून हे सिलिंडर पाेहचते झाल्याचे बाेरीकर यांनी सांगितले. ते मुंबईला पाेहचले पण ताैक्ते वादळामुळे बंदरावरच अडकल्याने नागपूरला येऊ शकले नाही. मात्र लवकरच ते पाेहचतील, असा विश्वास त्यांनी दिला.

Web Title: Their oxygen supply saved many lives ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.