शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
3
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
4
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
5
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
6
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
7
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
8
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
9
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
10
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
11
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
12
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
14
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
15
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
16
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
17
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
18
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
19
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
20
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात एलपीजीने भरलेल्या ट्रकची केली चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:27 IST

खापरीत एलपीजी सिलिंडर भरलेल्या ट्रकची चोरी करण्यात आली. पोलिसांनी ट्रकमध्ये लावलेल्या जीपीएसच्या साहाय्याने आरोपीला अटक केली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली.

ठळक मुद्देजीपीएसच्या मदतीने भेटला आरोपी : सूत्रधार झाला फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खापरीत एलपीजी सिलिंडर भरलेल्या ट्रकची चोरी करण्यात आली. पोलिसांनी ट्रकमध्ये लावलेल्या जीपीएसच्या साहाय्याने आरोपीला अटक केली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली.कैलाश बाबुलाल राठोड ( ४९) असे आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार भारत भास्कर हरडे (३५) फरार आहेत. दोघेही अमरावतीचे रहिवासी आहेत. न्यू सुभेदार ले-आऊट येथील रहिवासी नितीन बेलखोडे यांच्याकडे ट्रक क्रमांक एम. एच. ३१, सी. बी.-७६५१ आहे. राजेंद्र अजित त्यांचा ट्रकचालक आहे. १९ सप्टेंबरच्या रात्री १० वाजता राजेंद्रने एचपीसीएल येथून ४५० एलपीजी सिलिंडर घेतले. तो ट्रक खापरीमध्ये उभा करून कामानिमित्त निघून गेला. सिलिंडर एचपी डीलरच्या गोदामात पोहोचवायचे होते. अडीच तास झाल्यानंतर राजेंद्रला ट्रक चोरी झाल्याची माहिती मिळाली. राजेंद्रने याची माहिती आपले मालक नितीन बेलखोडे यांना दिली. बेलखोडे यांनी त्वरित बेलतरोडी ठाण्यात तक्रार दाखल केली. ४५० एलपीजी सिलिंडर असल्यामुळे पोलिसही सक्रिय झाले. जीपीएसच्या माध्यमातून त्यांना ट्रक अमरावतीकडे गेल्याची माहिती मिळाली. आरोपी लहान मार्गाने जात होते. त्यामुळे पोलिसांची चिंता वाढली. बेलतरोडी मार्गातील सर्व पोलीस ठाण्यांना सूचना देऊन ट्रक पकडण्याचे आवाहन केले. हिंगणघाटजवळ पोलिसांनी ट्रक पकडला. पोलिसांना पाहून भारत हरडे फरार झाला. ट्रकचालक कैलाश राठोड पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून १३.५० लाख रुपये किमतीचे एलपीजी सिलिंडर तसेच ट्रक हस्तगत केला. कैलाशने भारतच्या सांगण्यानुसार ट्रक चोरी केल्याची माहिती दिली. भारतने ट्रक खरेदी करून देण्याच्या बहाण्याने आपणास नागपुरात आणले असल्याचे त्याने सांगितले. भारतला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा होणार आहे.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरtheftचोरी