कंटेनरच्या टॅंकमधील डिझेलची चाेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:27 IST2020-12-15T04:27:29+5:302020-12-15T04:27:29+5:30
कन्हान : चालक कंटेनरच्या केबिनमध्ये झाेपला असताना चाेरट्याने टॅंकमधील २५ हजार रुपये किमतीचे ३६० लिटर डिझेल चाेरून नेले. ही ...

कंटेनरच्या टॅंकमधील डिझेलची चाेरी
कन्हान : चालक कंटेनरच्या केबिनमध्ये झाेपला असताना चाेरट्याने टॅंकमधील २५ हजार रुपये किमतीचे ३६० लिटर डिझेल चाेरून नेले. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) परिसरात रविवारी (दि. १३) मध्यरात्री घडली.
सुरेंद्र माखन सिंग (३३, रा. तजाैरा, मुरैना, मध्य प्रदेश) हा बुटीबाेरी येथून कंटेनरने जबलपूरला जायला निघाला. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास झाेप येत असल्याने त्याने कंटेनर कन्हान परिसरातील ढाब्याजवळ उभा केला आणि केबिनमध्ये झाेपी गेला. सकाळी (साेमवार, दि. १४) जाग आल्यावर त्याला कंटेनरच्या डिझेल टँकचे सेन्सर तुटले असल्याचे व डिझेल खाली सांडले असल्याचे आढळून आले. टॅंकमधील डिझेल चाेरीला गेल्याचे लक्षात येताच त्याने पाेलिसात तक्रार दाखल केली. चाेरट्याने २५ हजार रुपयांचे ३६० लिटर डिझेल चाेरून नेल्याचेही त्याने पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक सुरजुसे करीत आहेत.