आईसोबत झालेल्या वादात तरुणाने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 20:40 IST2022-02-07T20:40:05+5:302022-02-07T20:40:32+5:30
Nagpur News घरगुती कारणावरून आईसोबत वाद झाल्यानंतर बेसा चाैकात राहणारे शेख शकिल शेख सलाम (३६) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी सकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडली.

आईसोबत झालेल्या वादात तरुणाने घेतला गळफास
नागपूर : घरगुती कारणावरून आईसोबत वाद झाल्यानंतर बेसा चाैकात राहणारे शेख शकिल शेख सलाम (३६) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी सकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडली.
शकिल यांचे बेसा चाैकात वडिलोपार्जित घर आहे. खालचे दुकान त्यांनी मेडिकल स्टोअर्ससाठी भाड्याने दिले आहे, तर वरच्या माळ्यावर त्यांचा परिवार राहतो. घरगुती वाद वाढल्याने शकिल चार दिवसांपूर्वी ताजबागमध्ये भाड्याच्या घरात पत्नीसह राहायला गेले होते. रविवारी सकाळी ते घरी परतले आणि त्यांचा आईसोबत वाद सुरू झाला. तो वाढतच गेला. रागाच्या भरात शकिल छतावरच्या रूममध्ये गेले आणि त्यांनी गळफास लावून घेतला. ही बाब उघड होताच हादरलेल्या घरच्यांनी आरडाओरड केली. ती ऐकून बाजूची मंडळी धावली. माहिती कळताच एएसआय सवईथूल आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. त्यांनी शकिलच्या नातेवाईक शाहिन अब्दुल करीम (३९) यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----