महापालिकेकडून रस्त्यावर पसरलेला गाळ काढण्याचे काम सुरू
By मंगेश व्यवहारे | Updated: September 24, 2023 16:00 IST2023-09-24T16:00:14+5:302023-09-24T16:00:35+5:30
घराघरामध्ये पाणी शिरल्याने घरामध्ये ओल पसरली होती.

महापालिकेकडून रस्त्यावर पसरलेला गाळ काढण्याचे काम सुरू
नागपूर : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे अंबाझरी तलावाच्या पायथ्याशी असलेल्या वस्त्या जलमय झाल्या होत्या. शनिवारी पाऊस थांबल्यानंतर हळुहळू पाणी ओसरले मात्र वस्त्यांमधील रस्ते चिखलमय झाले होते. घराघरामध्ये पाणी शिरल्याने घरामध्ये ओल पसरली होती.
रविवारी सकाळपासून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कार्पोरेशन कॉलनी, डागा लेआऊट, काचीपुरा झोपडपट्टीतून रस्त्यावर पसरलेले चिखल काढण्याच्या कामाला सुरूवात केली. रस्त्यावर पसरलेली घाण काढून ब्लिचिंग करण्यात आले.
काही अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये पाणी साचल्याने पाणी काढणेही सुरू होते. ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांनी ओले झालेल्या वस्तू वाळायला टाकल्या. महापालिका प्रशासनानेही रविवारी सकाळी पाणी शिरलेल्या वस्त्यांमध्ये भेटी दिल्या. झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले.