यू टर्न घेतल्याने वाहनाने उडवले; पुलावरून पडून मायलेकाचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2023 08:44 PM2023-05-26T20:44:46+5:302023-05-26T20:45:10+5:30

Nagpur News उड्डाणपुलावर यू टर्न घेत असताना भरधाव चारचाकी वाहनाने धडक दिल्यामुळे आई आणि मुलाचा उड्डाणपुलावरून खाली पडून मृत्यू झाला, तर पती गंभीर झाल्याची घटना सदर उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री ११.२० वाजताच्या सुमारास घडली.

The vehicle blew up after making a U turn; Mileka ends by falling off a bridge | यू टर्न घेतल्याने वाहनाने उडवले; पुलावरून पडून मायलेकाचा अंत

यू टर्न घेतल्याने वाहनाने उडवले; पुलावरून पडून मायलेकाचा अंत

googlenewsNext

नागपूर : उड्डाणपुलावर यू टर्न घेत असताना भरधाव चारचाकी वाहनाने धडक दिल्यामुळे आई आणि मुलाचा उड्डाणपुलावरून खाली पडून मृत्यू झाला, तर पती गंभीर झाल्याची घटना सदर उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री ११.२० वाजताच्या सुमारास घडली.

योगेश्री कृष्णानंद आत्राम (वय ३०) आणि आलोक (वय ११) असे या अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत, तर अपघातात महिलेचा पती कृष्णानंद अवधूत आत्राम (वय ४०, रा.गोंड मोहल्ला, भांडेवाडी पारडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. कृष्णानंद हे आपली पत्नी योगेश्री व मुलगा आलोकसह सुरेंद्रगड गिट्टीखदान येथे सासुरवाडीला गेले होते. येथून ते आपली ज्युपिटर गाडी क्रमांक एम.एच. ४९, बी.एल-९९५७ ने घरी परत जात होते. या उड्डाणपुलावरून छावणीतील स्टेट बँक ऑफ इंडियासमोरून जात असताना कृष्णांनंद यांना रस्ता विसरल्यासारखे वाटल्याने त्यांनी आपले वाहन यूटर्न केले. यावेळी मागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात योगेश्री आणि आलोक उड्डाणपुलाच्या खाली फेकले जाऊन गंभीर जखमी झाले, तर कृष्णानंद हे पुलावर पडून गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी योगेश्री आणि आलोक यांना तपासून मृत घोषित केले. कृष्णानंद यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अज्ञात पांढऱ्या रंगाच्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा तपास सुरू केला आहे.

 

..............

Web Title: The vehicle blew up after making a U turn; Mileka ends by falling off a bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.