शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

विरोधकांची अवस्था अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ; मुख्यमंत्री शिंदेंची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 21:28 IST

'मोदीजींवरील प्रेमाची लाट संपूर्ण देशात आली आहे. घर घर मोदी नव्हे तर आता मना मनात मोदी असे वातावरण निर्माण झाले आहे.'

रामटेक - सत्तेच्या खुर्चीसाठी हपापलेला विरोध पक्ष मोदी द्वेषाने पिडीत आहे. ज्यांचे आयुष्य फक्त भ्रष्टाचार, घोटाळे आणि रोकड मोजण्यात गेले त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करण्याच नैतिक अधिकार नाही. विरोधकांची अवस्था ‘अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ’ अशी केविलवाणी झाली असल्याची जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.  मोदींवर अनेकदा टीका करता पण त्यांची दृष्टी पडली तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडाला फेस येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी उबाठा गटाला दिला.   रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे आणि नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते. मोदीजींवरील प्रेमाची लाट संपूर्ण देशात आली आहे. घर घर मोदी नव्हे तर आता मना मनात मोदी असे वातावरण निर्माण झाले आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 

विरोधकांनी जेव्हा जेव्हा मोदींजींवर आरोप केले, टीका केली तेव्हा जनतेने त्यांना जागा दाखवली. २०१४ मध्ये जनतेने विरोधकांना घरी बसवले. २०१९ मध्ये विरोधी पक्षासाठी आवश्यक खासदार देखील निवडून आले नाहीत. आता २०२४ मध्ये मला पूर्ण खात्री आहे की या निवडणुकीत विरोधी पक्षाला जनता घरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाही. साप आणि मुंगूसाची दोस्ती जनतेने ओळखली आहे, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. 

या लोकसभा निवडणुकीत मोदी सर्व रेकॉर्ड मोडीत काढून विजयी होतील. एनडीएकडे आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास विजयाकडे नेतो, तर अहंकार विनाशाकडे घेऊन जातो. मोदी आत्मविश्वासाने परिपूर्ण आहेत, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. २०१४ मध्ये मोदीजी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा शेअर बाजार २५००० अंकांवर होता. आज तो ७५००० अंकावर गेला आहे. देशाची आर्थिक प्रगती होत आहे. २५ कोटी लोकांना गरिबीतून वर आणले. कोरोना काळात ८० कोटी लोकांना मोफत रेशन दिले. 

अन्न, वस्त्र, निवारा देणारे मोदीजी आणि राष्ट्रपतींचा अपमान करणारे कॉंग्रेस यातील फरक जनतेने ओळखला आहे. राष्ट्रपतींचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसला या निवडणुकीत जनता धडा शिकवेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपा