शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मजबुरीचा फायदा अन् वासनेचा बाजार! पांचपावलीत कुरेशी दाम्पत्याचा 'गलिच्छ' कारभार पोलिसांनी उधळला; वाचा थरारक कारवाई.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 19:39 IST

Nagpur : पती-पत्नीच चालवायचे देहविक्रीचा काळा धंदा; गुन्हे शाखेचा धाडसी छापा, दोन महिलांची नरकातून सुटका

नागपूर : समाजात पती-पत्नीच्या नात्याला विश्वासाचा आणि पावित्र्याचा आधार मानले जाते, मात्र याच नात्याचा ढाल म्हणून वापर करत महिलांच्या अगतिकतेचा व्यापार करणाऱ्या एका टोळीचा नागपूर पोलिसांनी थरारक पर्दाफाश केला आहे. शहरात सक्रिय असलेल्या 'अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाने' (AHTU) एका अत्यंत धाडसी कारवाईत दोन पीडित महिलांना नरकयातनेतून बाहेर काढले असून, देहविक्रीचा हा काळा धंदा चालवणाऱ्या पती-पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत.

​बोगस ग्राहक अन् पोलिसांचा 'शार्प' सापळा!

​पांचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचशील नगर परिसरात एका घराच्या आडून देहविक्रीचे रॅकेट चालत असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ललिता तोडासे यांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवली. आरोपींना संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी स्वतः 'बोगस ग्राहक' बनून या जोडप्याशी संपर्क साधला. दोन महिलांचा सौदा ठरला आणि आरोपींना वाटले की आज मोठी 'कमाई' होईल; पण तिथे साक्षात खाकी त्यांची वाट पाहत होती.

​राणी दुर्गावती चौकात हाय-व्होल्टेज ड्रामा!

​सौदा पक्का झाल्यानंतर आरोपी पती-पत्नी दोन्ही महिलांना ग्राहकाकडे पोहोचवण्यासाठी निघाले. मात्र, ते राणी दुर्गावती चौक ओलांडण्यापूर्वीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. भर चौकात अचानक झालेल्या या कारवाईमुळे आरोपींची पळताभुई थोडी झाली. तपासादरम्यान समोर आले की, या महिलांना आर्थिक अडचणीत असल्याचा गैरफायदा घेऊन आणि पैशांचे आमिष दाखवून या दलदलीत ओढले गेले होते.

​कोण आहेत हे 'क्राईम पार्टनर'?

​अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे तौफिक नियाज कुरेशी आणि जोया तौफिक कुरेशी अशी आहेत. तपासातील सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे, जोया हिचा हा दुसरा विवाह होता. दोन वर्षांपूर्वी पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यावर तिने तौफिकशी विवाह केला. सुखाचा संसार करण्याऐवजी या दाम्पत्याने गुन्हेगारीचा रस्ता धरला आणि असहाय्य महिलांना टार्गेट करण्यास सुरुवात केली.

​'पीटा' कायद्यान्वये गुन्हा दाखल; तपासाचा फास आवळला

​पाचपावली पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींवर 'अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायदा' (PITA) नुसार गुन्हा दाखल केला आहे. सुटका केलेल्या महिलांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली असून, या रॅकेटचे जाळे शहरात आणखी कुठे पसरले आहे का? आणि याचे मुख्य सूत्रधार कोण आहेत? याचा कसून तपास आता पोलीस करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Police bust sex racket run by couple, rescue women.

Web Summary : Nagpur police exposed a couple running a sex racket under the guise of marriage. Two women were rescued from forced prostitution in a raid. The husband and wife were arrested and charged under PITA act as police investigate further.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर