डाेळ्यात मिरची पावडर फेकून पेट्राेलपंप मॅनेजरला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 22:43 IST2022-02-14T22:10:58+5:302022-02-14T22:43:53+5:30
Nagpur News कोंढाळी येथील भारत पेट्रोलियम पेट्रोल पंप व्यवस्थापकांच्या डोळ्यांत तिखट टाकून लुटल्याची घटना आज रात्री 8.45 वाजता कोंढाळी अमरावती मार्गावर किर्ती सॉ मिल समोर घडली.

डाेळ्यात मिरची पावडर फेकून पेट्राेलपंप मॅनेजरला लुटले
नागपूरः दुचाकीने जात असलेल्या पेट्राेल पंपच्या मॅनेजरला दाेघांनी वाटेत अडविले आणि काही कळण्याच्या आत त्यांच्या डाेळ्यात मिरची पावडर फेकले. दाेघांनीही त्यांच्याकडील ९८ हजार ४२ रुपये हिसकावून घेत पळ काढला. ही घटना काेंढाळी-अमरावती महामार्गावर साेमवारी (दि. १४) रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडली.
प्रकाश ठवळे (५५, रा. काेंढाळी, ता. काटाेल) हे काेंढाळी जवळ असलेल्या काेंढाळी-अमरावती महामार्गालगतच्या भारत पेट्रोलियमच्या पेट्राेल पंपवर मॅनेजर म्हणून नाेकरी करतात. ते साेमवारी रात्री दिवसभराच्या पेट्राेल, डिझेल विक्रीतून आलेले ९८ हजार ४२ रुपये घेऊन स्कुटीने काेंढाळीला येत हाेते.
काही अंतरावर दाेन अज्ञात तरुणांनी त्यांना अडविले. त्यांनी प्रकाश ठवळे यांच्या डाेळ्यात मिरची पावडर फेकले व धक्का देऊन त्यांना खाली पाडले. दाेघांनीही स्कुटीच्या डिक्कीतील रकमेची बॅग काढून दाेघांनीही लगेच पळ काढला. त्यानंतर प्रकाश ठवळे यांनी पाेलीस ठाणे गाठले. त्या बॅगेत ९८ हजार ४२ रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक अजित कदम करीत आहेत.