शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

होस्टेलमध्येच सुरू असलेले नर्सिंग कॉलेज आता बंद होणार

By सुमेध वाघमार | Updated: August 28, 2023 19:12 IST

मेडिकल नर्सिंग कॉलेजच्या इमारतीसाठी ५० कोटी मंजूर

नागपूर : आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या मेडिकलच्या नर्सिंग कॉलेजला स्वत:ची इमारतच नाही. आजही याचे कॉलेजचे वर्ग होस्टेलमध्येच भरतात. तब्बल ५० वर्षानंतर या इमारतीसाठी आता विशेष प्रयत्न झाल्याने सरकारने बांधकामासाठी ५० कोटींना मंजुरी दिली. 

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाºया जम्मू-काश्मीरमधील शीतल राजकुमार या विद्यार्थिनीचा ५ जुलै रोजी एका आजाराने अचानक मृत्यू झाला. या मृत्यूला कारणीभूत असलेल्या होस्टेलमधील समस्या ठळकपणे पुढे आल्या. कॉलेजला स्वत:ची इमारतच नसल्याची आणि नर्सिंगचे वर्ग चक्क होस्टेलमध्ये भरत असल्याची बाबही समोर आली. विशेष म्हणजे, १९५८ मध्ये   मेडिकलचा बांधकामाचा नकाशात नर्सिंग कॉलेजची स्वतंत्र इमारत मंजूर होती. कॉलेजची इमारत बांधण्यापूर्वी नर्सिंग होस्टेलचे बांधकाम झाले. त्यानंतर होस्टेलसमोरील मोकळ्या भूखंडावर नर्सिंगची स्वतंत्र इमारत तयार होणार होती. परंतु नंतर कोणीच पुढाकार घेतला नाही. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी पदभार सांभाळल्यानंतर नर्सिंग कॉलेजच्या बांधकामला गंभीरतेने घेतले होते. त्यांचे प्रयत्न सुरू असतानाच जुलै महिन्यात एका विद्यार्थिनीच्या अचानक मृत्यूने नर्सिंग कॉलेजमधील गैरसोयींचा पाढाच वाचण्यात आला. परिणामी, सरकारनेही याची दखल घेत कॉलेजच्या बांधकामासाठी ५० कोटी ६५ लाख ७१ हजार ८५३ रुपयांचा निधीला प्रशासकीय मान्यता दिली. 

होस्टेलमध्ये बीएस.सी. नर्सिंगचे वर्ग

२००६ पासून बीएस.सी नर्सिंग सुरू झाले. या नव्या अभ्यासक्रमाचे वर्गही याच होस्टेलमध्ये सुरू झाले. विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोयही वसतिगृहात होत असल्याने विद्यार्थ्यांसोबतच येथील शिक्षकांसाठी गैरसोयीचे होत होते. उशीरा का होईना आता कॉलेजची स्वतंत्र इमारत होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला.

७७ कोटींचा होता प्रस्ताव 

नर्सिंग कॉलेजचा इमारतीचा ७७ कोटींचा प्रस्ताव होता, परंतु मान्यात ५० कोटी ६५ लाख रुपयांनाच मिळाली. यामुळे इमारत तीन मजलीची राहणार असलीतरी काही वर्ग खोल्या कमी होण्याची शक्यता आहे.

-नर्सिंग कॉलेजचा प्रगतीसाठी प्रयत्न 

मेडिकल नर्सिंग कॉलेजला स्वतंत्र इमारत असावी यााठी सुरुवातीपासून प्रयत्न सुरू होते. अखेर त्याला यश मिळाले. बांधकामासाठी ५० कोटी ६५ लाख रुपयांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. मेडिकल कॉलेजचा अमृत महोत्सव होऊ घातला असताना नर्सिंग कॉलेजची इमारत होणे हा मोठा दिलासा आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल, त्यांना अधिक दर्जेदार शिक्षण देण्यासही मदत होईल.

-डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता मेडिकल