शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मिहान सेझमधील ल्युपिनला अमेरिकेसाठी इंजेक्टेबल औषधी बनविण्यासाठी मिळाली परवानगी

By मोरेश्वर मानापुरे | Updated: October 31, 2022 15:30 IST

ल्युपिन लिमिटेडच्या नागपुरातील प्रकल्पात आतापर्यंत ओरल औषधांचे उत्पादन

नागपूर : वेदांता-फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस हे रोजगार देणारे प्रकल्प नागपुरातून गुजरातेत गेले आहेत. या प्रकल्पावरून सर्वच पक्षांमध्ये आरोपांच्या फैरी सुरू आहेत. अशातच मिहान-सेझकरिता गुड न्यूज आहे. मिहान सेझमधील औषध निर्माता ल्युपिन कंपनीला अमेरिकन बाजारासाठी इंजेक्टेबल औषधी बनविण्याची परवानगी मिळाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, कंपनीच्या मिहान-सेझमधील प्रकल्पातील दुसऱ्या युनिटला अमेरिकन औषधी विभाग यूएसएफडीएने पाच सूचनांसह फॉर्म-४८३ जारी केले आहे. अमेरिकन अन्न व औषधी प्रशासनाने (यूएसएफडीए) उत्पादन प्रकल्पाचे निरीक्षण केल्यानंतर फॉर्म-४८३ कंपनीला जारी करण्यात आल्याची माहिती आहे. देशातीलनामांकित औषधी उत्पादक कंपनी ल्युपिन लिमिटेडच्या नागपुरातील प्रकल्पात आतापर्यंत ओरल औषधांचे उत्पादन होते.

या औषधांची १०० टक्के निर्यात करण्यात येते. कंपनीने नागपुरातच इंजेक्टेबल औषधीच्या उत्पादनाकरिता अमेरिकल अन्न व औषध प्रशासन विभागाकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार यूएसएफडीएच्या चमूने नागपूरच्या प्रकल्पातील दुसऱ्या युनिटचे निरीक्षक १७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान केले होते, हे विशेष.

टॅग्स :Mihanमिहानnagpurनागपूर