शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

स्फोटकांच्या संशयाने दक्षिण एक्सप्रेसमधील प्रवाशांचा जीव दहशतीत

By नरेश डोंगरे | Updated: December 9, 2024 23:33 IST

तब्बल तीन तास जीव मुठीत घेऊन प्रवास : नागपूर स्थानकावर अख्खा कोच झाला खाली

- नरेश डोंगरे

नागपूर : दक्षिण एक्सप्रेसच्या कोचमध्ये पडून असलेल्या बेवारस बॅगमध्ये स्फोटके असल्याची शंका निर्माण झाल्याने प्रवाशांना प्रचंड दहशतीत आमला ते नागपूरपर्यंत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला. हजरत निजामुद्दीन दिल्ली स्थानकावरून हैदराबादकडे निघालेल्या ट्रेन नंबर १२७२२ दक्षिण एक्सप्रेसच्या थर्ड एसी कोच (१९२८८०)च्या बर्थ नंबर ६६ खाली बऱ्याच वेळेपासून एक बेवारस बॅग पडून होती. त्यात स्फोटके असावी, असा संशय आल्याने कोचमधील प्रवाशांमध्ये कुजबूज सुरू झाली. 

दरम्यान, आमला रेल्वे स्थानकावरून गाडी नागपूरकडे निघाल्यानंतर एका प्रवाशाने या बॅगमध्ये स्फोटके असल्याचा संशय व्यक्त करणारी तक्रार रेल्वे कंट्रोलला केली. त्यामुळे नागपूर रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल अलर्ट मोडवर आले. त्यांनी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस), डॉग स्कॉड सज्ज केले. ईकडे धडधडत नागपूरकडे येणाऱ्या या गाडीच्या कोचमधील प्रवाशांचा जीव स्फोटकांच्या शंकेमुळे अक्षरश: टांगणीला लागला होता. 

अनेकांनी त्या बॅगजवळ असलेल्या आपल्या सीटस् सोडून दोन्ही टोकांच्या दाराजवळ उभे राहून प्रवास करणे पसंत केले. गाडी सायंकाळी ५ च्या सुमारास नागपुरात येताच. प्रवाशांनी फलाटावर अक्षरश: उड्या घेत कोच रिकामा केला. दरम्यान, रेल्वेच्या पोलीस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जीआरपीचे एपीआय गौरव गावंडे यांनी बीडीडीएसच्या माध्यमातून ही बॅग खाली काढली. 

प्रवाशांची गर्दी बाजुला हटवून श्वानाच्या मदतीने बॅगची तपासणी करण्यात आली. बॅगमध्ये स्फोटके अथवा तसे काहीच आक्षेपार्ह्य नसल्याचे संकेत श्वानाने दिले. त्यामुळे बॅग उघडून तपासली असता त्यात केवळ कपडे आणि कागदपत्रे आढळली. ते कळताच अडीच-तीन तासांपासून जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.

संपूर्ण गाडीची तपासणीखबरदारीचा उपाय म्हणून जीआरपी, आरपीएफने संपूर्ण गाडीची कसून तपासणी केली. गाडीत काहीही आक्षेपार्ह्य नसल्याची खात्री पटल्यानंतर अर्धा तास विलंबाने ही गाडी हैदराबादकडे रवाना करण्यात आली.

भोपाळच्या प्रवाशाच्या चुकीमुळे दहशतबॅगमधील कागदपत्रांच्या आधारे जीआरपीने चाैकशी केली असता ती भोपाळमधील एका प्रवाशाची असल्याचे स्पष्ट झाले. तो गाडीतून घाईगडबडीत उतरल्याने ही बॅग सोबत घेण्याचे विसरला आणि नंतर यामुळे अनेक प्रवाशांना दहशतीत प्रवास करावा लागला.

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वे