लिंक उघडली अन् एक लाखाची जमापुंजी गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 19:45 IST2022-03-11T19:44:46+5:302022-03-11T19:45:17+5:30
Nagpur News आरोपीने लिंक पाठविल्यानंतर ती उघडताच एका व्यक्तीच्या खात्यातून एक लाखाची जमापुंजी गेल्याची घटना बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १८ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

लिंक उघडली अन् एक लाखाची जमापुंजी गेली
नागपूर : आरोपीने लिंक पाठविल्यानंतर ती उघडताच एका व्यक्तीच्या खात्यातून एक लाखाची जमापुंजी गेल्याची घटना बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १८ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
स्वप्नील विनोद पटले (२८, व्हेलेसी आयुर्वेदिक हॉस्पिटल, लक्ष्मीनगर) यांच्या खात्यातून एक हजार रुपये कापले गेले. त्यांनी आरोपी मोबाईलधारकास फोन करुन पैसे का कापले याची विचारणा केली. त्यावर आरोपीने त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना एक लिंक पाठविली. पटले यांनी लिंक उघडताच त्यांच्या खात्यातून एक लाख रुपये आरोपीने वळते केले. पटले यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणूक आणि आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
.............