नागपूर मेट्रोने उभारला देशातील सर्वात मोठा थ्रीडी-२० लोगो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2023 21:09 IST2023-03-18T21:08:50+5:302023-03-18T21:09:16+5:30
Nagpur News नागपूर शहरातील विविध संस्थांकडून जी-२० परिषदेची तयारी सुरू असताना नागपूर मेट्रोच्या एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन येथे जी - २० थीमवर एक मोठा थ्रीडी लोगो बसविण्यात आला आहे.

नागपूर मेट्रोने उभारला देशातील सर्वात मोठा थ्रीडी-२० लोगो
नागपूर: शहरातील विविध संस्थांकडून जी-२० परिषदेची तयारी सुरू असताना नागपूर मेट्रोच्या एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन येथे जी - २० थीमवर एक मोठा थ्रीडी लोगो बसविण्यात आला आहे. हा लोगो आणि इतर क्रिएटिव्ह मॉडेल हे देशातील एकमेव मॉडेल ठरले आहे.
महा मेट्रोने बनवलेल्या लोगो मध्ये टायगर मॅस्कॉट, जी-२० आणि नागपूर मेट्रोच्या लोगोचा समावेश आहे. १३० फूट रुंद आणि २० फूट उंच, अश्या सुमारे १००० किलो वजनाची ही संपूर्ण रचना आहे. संपूर्ण साहित्य फायबर रीइन्सफोर्ट प्लास्टिक (FRP) च्या माध्यमाने बनविण्यात आले आहे.
एयरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन समोरील ३०,००० स्क्वेअर फूट परिसरात थीम पार्क तयार केला जात असून त्यात हा लोगो स्थित आहे. विविध आकर्षक फुलांच्या रोपट्यांनी हे उद्यान सजवले जाईल. या थीम पार्कमध्ये अभ्यागतांसाठी बसण्याची तसेच स्केटिंगची व्यवस्था असेल. या सोबतच करमणुकीचे इतर साधने देखील असतील.
भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्ष पूर्तीच्या निमित्ताने `आजादी का अमृत महोत्सव' अंतर्गत नागपूर मेट्रोने झिरो माइल स्टेशनला झिरो माईल फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन असे नाव दिले आहे. झिरो माईल फ्रीडम पार्क नंतर, आता थीम पार्कच्या निमित्ताने आता नागपूर मेट्रो आणखी एक विशेष निर्मिती करीत आहे. हा थीम पार्क शहराती सर्वात गजबजलेल्या वर्धा मार्गाला लागून असल्याने नागपूरकरांकरिता ही एक पर्वणी ठरणार आहे.