शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

हायकमांडकडून वडेट्टीवारांनाच पुढे करीत पटोलेंना ‘चेक’; प्रदेशाध्यक्षपद जाणार?

By कमलेश वानखेडे | Updated: August 2, 2023 11:14 IST

पटोले यांच्या रूपात आधीच प्रदेशाध्यक्षपद विदर्भाकडे आहे. त्यात आता विरोधी पक्षनेतेपदाची भर पडली. त्यामुळे आता पटोलेंचे पद जाणार तर नाही ना, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात रंगली आहे.

नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद खेचण्यात काँग्रेसला यश आले असून, या पदावर माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नावावर पक्षाकडून शिक्कामोर्तब झाले. गेल्या काही दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नेम साधणारे वडेट्टीवार यांना हायकमांडकडून एकप्रकारे पाठबळ देण्यात आले आहे. पटोले यांच्या रूपात आधीच प्रदेशाध्यक्षपद विदर्भाकडे आहे. त्यात आता विरोधी पक्षनेतेपदाची भर पडली. त्यामुळे आता पटोलेंचे पद जाणार तर नाही ना, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात रंगली आहे.काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण व बाळासाहेब थोरात या तीन दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत होती, तर दुसऱ्या फळीतील सुनील केदार, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे यांच्या नावांचीही जोरदार चर्चा होती;  पण शेवटी विदर्भातीलच पटोले विरोधक असलेले वडेट्टीवार यांना संधी देण्यात आली. या नियुक्तीमागे पटोले यांना ‘चेक’ देण्याची हायकमांडची खेळी असल्याची चर्चा आहे. पटोले व वडेट्टीवार यांच्यात काही दिवसांपासून राजकीय कलगीतुरा सुरू आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपला साथ दिल्याच्या कारणावरून पटोले यांनी चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना पदमुक्त केले होते. देवतळे हे वडेट्टीवारांचे समर्थक आहेत. या कारवाईमुळे दुखावलेल्या वडेट्टीवारांनी समर्थकांसह दिल्ली गाठत पटोलेंकडून राजकीय द्वेषातून कारवाई करण्यात आल्याची बाजू मांडली होती. 

आधी विखे, आता पवारांमुळे संधी राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवारच शिंदे सरकारसोबत थेट सत्तेत बसले. तेव्हापासून विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते. या पदावर व़डेट्टीवार यांना संधी मिळाली. यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना राधाकृष्ण विखे-पाटील भाजपसोबत गेल्यामुळे २४ जून २०१९ रोजी वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते पदाची संधी मिळाली होती.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारnagpurनागपूरNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस