शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात वडिलांना न्यायासनावर पाहिले ते न्यायदेवतेचे पहिले दर्शन; सरन्यायाधीश उदय लळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 12:26 IST

हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीने डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित देशाचे ४९वे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या सत्काराचा सोहळा सर्व उपस्थितांनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने खऱ्या अर्थाने कौटुंबिक सोहळा ठरला.

नागपूर : वडील उमेश लळीत मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती झाल्यानंतर त्यांच्या नागपुरातील शपथविधीला हजर नव्हतो, परंतु त्यांचे पद जाणार कळल्यानंतर, त्यांना काम करताना पाहण्यासाठी न्यायालयात आलो होतो. ते दृश्य हे न्यायदेवतेचे पहिले दर्शन, न्यायदानाच्या क्षेत्रातील जणू पहिले पाऊल होते, अशी हृदय आठवण सरन्यायाधीश उदय लळीत यांनी शनिवारी येथे राज्यातील पहिल्या सत्काराच्या वेळी सांगितली. त्या आठवणींनी ते गहिवरले. भावना अनावर झाल्याने त्यांनी भाषण आटोपते घेतले.हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीने डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित देशाचे ४९वे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या सत्काराचा सोहळा सर्व उपस्थितांनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने खऱ्या अर्थाने कौटुंबिक सोहळा ठरला. सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते सरन्यायाधीशांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी, न्यायमूर्ती सुनील शुक्रे, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर व सरन्यायाधीश लळीत यांच्या पत्नी अमिता लळीत मंचावर होत्या. सरन्यायाधीश लळीत यांनी नागपुरातील बालपणीच्या आठवणी सांगितल्या. वडील १९७४ ते १९७६ या काळात नागपूर खंडपीठात अतिरिक्त न्यायमूर्ती होते. त्यामुळे आपला कायद्यासोबतचा खरा प्रवास नागपूरमधून सुरू झाला. पुढे वकील म्हणून येथे अनेक प्रकरणांमध्ये युक्तिवाद केला. नागपूरसोबत अत्यंत भावनिक संबंध आहेत, असे ते म्हणाले. 

हे ललीत नसून लळीत आहेतसरन्यायाधीश लळीत यांना बहुतेक जण ललीत म्हणतात, परंतु सरन्यायाधीशांचे आडनाव ललीत नसून लळीत आहे, असा खुलासा सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी केला, त्यांनी लळीत यांच्या बौद्धिक संपन्नतेची प्रशंसाही केली. त्यांच्या नेतृत्वात भारतीय न्यायव्यवस्थेला विकासाची दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

न्यायव्यवस्थेचा नवीन काळ सुरू होईलसरन्यायाधीश लळीत अत्यंत उच्च बुद्धिमत्ता लाभलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय न्यायव्यवस्थेचा नवीन काळ सुरू होईल, असे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितले. 

टॅग्स :Uday Lalitउदय लळीतSupreme Courtसर्वोच्च न्यायालयnagpurनागपूर