कुटुंब भोपाळला गेले अन चोरट्यांनी घर साफ केले

By योगेश पांडे | Updated: June 13, 2023 18:06 IST2023-06-13T18:06:27+5:302023-06-13T18:06:52+5:30

Nagpur News सर्व कुटुंबिय बाहेरगावी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी पावनभूमी परिसरात घरफोडी करत ४.५५ लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

The family went to Bhopal and the thieves cleaned the house | कुटुंब भोपाळला गेले अन चोरट्यांनी घर साफ केले

कुटुंब भोपाळला गेले अन चोरट्यांनी घर साफ केले

नागपूर : सर्व कुटुंबिय बाहेरगावी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी पावनभूमी परिसरात घरफोडी करत ४.५५ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.


साधना संजय जोशी (६४, पावनभूमी) या ९ जून रोजी घराला कुलूप लावून कुटुंबियांसह भोपाळ येथे नातेवाईकांकडे गेल्या होत्या. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व बेडरूममधील लोखंडी आलमारीतील सोन्याचांदीचे दागिने, घड्याळ, रोख १० हजार रुपये असा ४.५५ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. १२ जून रोजी सकाळी परत आले असता जोशी यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The family went to Bhopal and the thieves cleaned the house