शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

आधीच परीक्षा उशिरा त्यात.. महापालिका निवडणुकीचा नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:46 IST

Nagpur : आधीच रखडलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेला महापालिका निवडणुकीचा फटका बसणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आधीच रखडलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेला महापालिका निवडणुकीचा फटका बसणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाली असल्याने १४ ते १६ जानेवारीदरम्यान होणाऱ्या हिवाळी परीक्षांचे वेळापत्रक बदलण्याची प्रक्रिया विद्यापीठाने सुरू केली आहे. या काळातील पेपर पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. एकीकडे विद्यापीठाच्या परीक्षा आधीच सुमारे दोन महिने उशिरा होत असताना, आता आणखी ३ ते ४ दिवसांचा विलंबही विद्यार्थ्यांसाठी अडचणीचा ठरू शकतो.

यंदा विद्यापीठाकडून हिवाळी सत्राच्या परीक्षा उशिरा घेण्यात येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार, याची आधीच शक्यता होती. मात्र, त्या जानेवारीतच होतील की नाही, हे निश्चित नव्हते. जानेवारीत न झाल्यास त्या एप्रिल-मे महिन्यात होणे अपेक्षित होते. पहिल्या टप्प्यात बँक विषयांच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. आता नियमित परीक्षाही सुरू होणार असल्याने अनेक विषयांचे बँक पेपर आणि नियमित पेपर एकाच दिवशी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढे आणखी अडचणी वाढू शकतात. दरम्यान, मनपा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच विद्यापीठ प्रशासनाने परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तसेच निवडणूक कामकाजासाठी मोठ्या प्रमाणावर अध्यापन व अशैक्षणिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार असल्याने हे वेळापत्रक बदलण्यात येत आहे. यापूर्वीच विद्यार्थ्यांनी १४ जानेवारी रोजी परीक्षा घेण्यास आक्षेप नोंदवला होता. 

कारण त्या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते. मनपा निवडणुका शाळा व महाविद्यालयांमध्ये घेतल्या जातात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असते. यात विद्यापीठासह अनुदानित व महाविद्यालयांतील कर्मचारी अधिकाऱ्यांची निवडणूक ड्यूटी लागणार आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १४ जानेवारीपासून केंद्रांवर कर्मचारी हजर राहतील आणि १६ जानेवारीपर्यंत ते निवडणूक कामकाजात गुंतलेले राहतील. त्यामुळे या तीन दिवसांतील परीक्षांच्या तारखा बदलणे अपरिहार्य ठरणार आहे. नियमित सेमिस्टरच्या परीक्षा २२ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत, तर पदव्युत्तर परीक्षांना १६ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. डिसेंबरमधील परीक्षांवर याचा परिणाम होणार नाही; मात्र जानेवारीतील परीक्षा बदलाव्या लागतील. नियमित आणि बॅकलॉग परीक्षा एकमेकांवर ओव्हरलॅप होणार नाहीत, असा प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाकडून केला जाणार आहे. मात्र, हे काम आव्हानात्मक ठरणार आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत अधिसूचना जारी केली जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur University students hit by delayed exams, election schedule.

Web Summary : Nagpur University's winter exams, already delayed, face further disruption due to upcoming municipal elections. Exams scheduled January 14-16 may be postponed, causing more inconvenience for students. The university is working to reschedule, avoiding overlap between regular and backlog papers.
टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूरStudentविद्यार्थीexamपरीक्षाNagpur Municipal Corporation Electionनागपूर महानगरपालिका निवडणूक २०२६