शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे गाड्यांमध्ये 'द बर्निंग ट्रेन'चे सापळे? पॅन्ट्रीकारच्या मॅनेजरकडून प्रतिबंधित साहित्यांचा वापर

By नरेश डोंगरे | Updated: July 26, 2025 20:03 IST

हजारो प्रवाशांच्या जीवांशी खेळ : भुवनेश्वर एक्स्प्रेसमध्ये पॅन्ट्रीकार मॅनेजरकडून इलेक्ट्रॉनिक हिटरचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :रेल्वे गाडीत आग लागून किंवा स्फोट होऊन हजारो प्रवाशांच्या जान-मालाला धोका होऊ शकतो, याची कल्पना असूनही अनेक 'पॅन्ट्री कार'चे मॅनेजर विविध रेल्वे गाड्यांमध्ये 'द बर्निंग ट्रेन'चे सापळे लावत आहेत. गेल्या तीन आठवड्यात अशा प्रकारची चार धक्कादायक उदाहरणे उजेडात आल्याने रेल्वे प्रशासनाला जबर हादरा बसला आहे.

रेल्वे गाड्यांत आग लागली किंवा स्फोट झाल्यास भयंकर आक्रित घडू शकते. अनेकदा तशा घटनांमधील भयावह दुष्परिणाम समोर आल्याने रेल्वे गाड्यांमध्ये पेट्रोल, डिजेल, रॉकेल, हिटर, स्टोव्ह, सिलिंडर, फटाके अथवा अशाच दुसऱ्या ज्वलनशील आणि स्फोटक पदार्थांच्या वापराला आणि वाहतुकीला प्रतिबंध आहे. असे साहित्य रेल्वेगाड्यांमधून कुणी नेऊ नये म्हणून सुरक्षा यंत्रणा सूक्ष्म नजर ठेवून असतात. कुणी सापडल्यास कडक कारवाई केली जाते. त्यामुळे अलिकडे प्रवासी तसा प्रयत्न करताना दिसत नाहीत. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून रोज हजारो रुपयांचा मलिदा लाटणारे काही 'पँट्रीकार मॅनेजर'च अशा साहित्याचा धावत्या ट्र्रेनमध्ये वापर करताना दिसतात आहेत. ४ जुलैला पोरबंदर हावडा एक्स्प्रेसच्या पँट्रीकारमध्ये (किचन) खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी प्रतिबंधित सिलिंडरचा वापर केला जात असल्याचे उघडकीस आले. आरपीएफने या प्रकरणी एकाला अटक केली. त्यानंतर ११ जुलैला एलटीटी भुवनेश्वर एक्स्प्रेसमध्ये पॅन्ट्रीकार मॅनेजर नागेंद्र शर्मा इलेक्ट्रॉनिक हिटरचा वापर करून खाद्यपदार्थ बनवत असल्याचे दिसून आला. २३ जुलैला आजाद हिंद एक्सप्रेस (पुणे–हावडा)मध्ये पॅन्ट्रीकारमधील कृष्णा शर्मा (वय २५ ) हा चहा तयार करण्यासाठी इमर्शन रॉडचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले. तर, हावडा सीएसएमटी मेलच्या पॅन्ट्रीकार मध्ये संतोषकुमार शर्मा (वय ३०) हा देखिल अशाच प्रतिबंधित उपकरणाचा वापर करताना आढळला. 

हे तर ‘टिक-टिक बॉम्ब’पॅन्ट्रीकारमध्ये ज्वलनशील तसेच उच्चदाबाच्या विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या वापरावर बंदी आहे. अशा उपकरणांचा वापर केल्यास शॉर्टसर्किट होऊन ट्रेनमध्ये आग लागण्याचा, स्फोट होण्याचा धोका असतो. एकीकडे घातपाताचे प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत असताना आता हा नवाच धोका पुढे आला आहे.

'' आगीचे धोके रोखण्यासाठी 'ऑपरेशन सुरक्षा' मोहिम सुरू करण्यात आली. त्यानुसार, रेल्वेगाड्यांच्या पॅन्ट्रीकारची तपासणी केली जात आहे.-दीपचंद्र आर्य, सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, नागपूर विभाग.

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वे