योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवी दिल्ली येथे लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर सुरक्षायंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संबंधित स्फोट हा ‘आयईडी’ किंवा ‘आरडीएक्स’मुळे झाला का याची चाचपणी सुरू आहे. मात्र या स्फोटामुळे देशाअंतर्गत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. २०१४ सालापासून देशाअंतर्गत दहशतवादी हल्ल्यांत कमी आल्याचा दावा करण्यात येत होता. गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार दहा वर्षांत जम्मू-काश्मीर, नक्षलप्रभावित भाग वगळता देशाअंतर्गत १२ दहशतवादी हल्ले नोंदविण्यात आले व त्यात १४ हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये मात्र दहशतवादाशी निगडीत असलेल्या दीड हजारांहून अधिक घटनांची मागील दहा वर्षांत नोंद झाली.दिल्लीतील स्फोटानंतर विविध कयास लावण्यात येत आहेत.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी फरीदाबादमधून मोठ्या प्रमाणावर स्फोटक साठा जप्त केल्यानंतर लगेच दिल्लीतील स्फोट झाल्याने हा दहशतवादी हल्ला आहे का या दिशेने सुरक्षा यंत्रणांचा तपास सुरू आहे. मागील काही वर्षांत देशातील अंतर्गत भागांत दहशतवादी हल्ल्यांची संख्या नियंत्रणात आली होती. २०१४ ते २०२५ या कालावधीत १२ दहशतवादी हल्ले झाले व त्यात १४ जणांचा मृत्यू झाला. तर ११ सुरक्षा जवानांचा त्यात मृत्यू झाला.
देशाअंतर्गतचा सर्वात मोठा शेवटचा स्फोट केरळमध्ये झाला होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये केरळमधील एर्नाकुलम येथील कलामासेरी कन्व्हेंशन सेंटरमध्ये प्रार्थनासभेत झालेल्या स्फोटांत आठ जणांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला त्यात तीन जणांचा जीव गेला होता, मात्र त्यानंतर उपचारादरम्यान पाच जणांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यानंतर २०२४ मध्ये बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेत आयईडी स्फोट घडवून आणण्यात आला होता व त्यात आठ जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतरचा देशाअंतर्गतच्या शहरांतील हा सर्वात मोठा स्फोट ठरला आहे.
जम्मू-काश्मीर ठरले दहशतवाद्यांचे ‘टार्गेट’
२०१४ सालापासून एकीकडे देशाअंतर्गतच्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ल्यांवर नियंत्रण आले होते. मात्र दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये मात्र दहशतवादी घटना सुरूच होत्या. २०१४ ते २०२४ या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये १ हजार ५०० हून अधिक दहशतवादी घटना घडल्या. २०१८ पासून या संख्येत घट दिसून आली.
देशाअंतर्गत झालेले दहशतवादी हल्ले (जम्मू-काश्मीर वगळता)
वर्ष : दहशतवादी हल्ले : नागरिकांचा मृत्यू : सुरक्षाजवानांचा मृत्यू
२०१४ : ३ : ४ : ०२०१५ : १ : ३ : ४२०१६ : १ : १ : ७२०१७ : ० : ० : ०२०१८ : १ : ३ : ०२०१९ : ० : ० : ०२०२० : ० : ० : ०२०२१ : १ : ० : ०२०२२ : ३ : ० : ०२०२३ : १ : ३ : ०२०२४ : १ : ० : ०
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटना
वर्ष : घटना : नागरिकांचा मृत्यू : सुरक्षाजवानांचा मृत्यू२०१८ : २२८ : ४० : ९१२०१९ : १५३ : ३९ : ८०२०२० : १२६ : ३२ : ६३२०२१ : १२९ : ३७ : ४२२०२२ : १२५ : २६ : ३२२०२३ : ४६ : १४ : ३०
Web Summary : Delhi blast raises terror concerns. Post-2014, internal attacks decreased, but Jammu & Kashmir saw numerous incidents. Kerala's 2024 blast was the largest prior, followed by Bangalore. J&K remains a key target.
Web Summary : दिल्ली विस्फोट से आतंक की चिंता बढ़ी। 2014 के बाद, आंतरिक हमले कम हुए, लेकिन जम्मू और कश्मीर में कई घटनाएं हुईं। केरल का 2024 का विस्फोट सबसे बड़ा था, जिसके बाद बैंगलोर का विस्फोट हुआ। जम्मू-कश्मीर एक प्रमुख लक्ष्य बना हुआ है।