सोयाबीन खरेदी मुदतवाढीचे घोंगडे भिजतच, मंत्र्यांनी घोषणा केली, पण आदेशच नाहीत!

By सुनील चरपे | Updated: January 13, 2025 10:41 IST2025-01-13T10:41:18+5:302025-01-13T10:41:24+5:30

बारदान्याअभावी राज्यातील नाफेडच्या बहुतांश केंद्रावरील साेयाबीन खरेदी बंद आहे. हा तिढा साेडविण्यासाठी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबई येथे विशेष बैठक पार पडली.

The blankets of soybean purchase extension are getting soaked | सोयाबीन खरेदी मुदतवाढीचे घोंगडे भिजतच, मंत्र्यांनी घोषणा केली, पण आदेशच नाहीत!

सोयाबीन खरेदी मुदतवाढीचे घोंगडे भिजतच, मंत्र्यांनी घोषणा केली, पण आदेशच नाहीत!

नागपूर : राज्यात नाफेड व एनसीसीएफद्वारे एमएसपी दराने केल्या जाणाऱ्या साेयाबीन खरेदीची मुदत रविवारी (दि.१२) संपली आहे. या खरेदीला मुदतवाढ देण्याची घाेषणा पणनमंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी (दि. ८) केली. मात्र, नाफेड, एनसीसीएफ व पणनच्या अधिकाऱ्यांना या मुदतवाढीचे ताेंडी अथवा लेखी आदेश रविवारी रात्रीपर्यंत प्राप्त झाले नव्हते. यासंदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती पणनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

बारदान्याअभावी राज्यातील नाफेडच्या बहुतांश केंद्रावरील साेयाबीन खरेदी बंद आहे. हा तिढा साेडविण्यासाठी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबई येथे विशेष बैठक पार पडली. या बैठकीत साेयाबीन खरेदीच्या सात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. साेयाबीन खरेदी मुदतवाढीचा या बैठकीच्या इतिवृत्तात उल्लेख नाही. बैठकीत साेयाबीन खरेदी मुदतवाढीवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. 
त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मंजुरी प्राप्त हाेताच, मुदतवाढीची पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती पणनच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे साेयाबीन खरेदीवर सध्यातरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मंजुरीसाठी आणखी किती दिवस ?
- नाफेड व एनसीसीएफ या दाेन्ही संस्था केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्य करतात. 
- राज्य सरकारच्या पणन मंत्रालयाने केंद्राकडे गुरुवारी (दि. ९) साेयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर केला. चार दिवस पूर्ण हाेऊनही केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही.

३१ जानेवारीपर्यंतचा प्रस्ताव
साेयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळावी, असा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मुदतवाढ मागितली जाईल, असेही पणनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: The blankets of soybean purchase extension are getting soaked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.