शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

'मी जी मोठी चूक केली, आता ती बावनकुळेंनी करू नये'; नितीन गडकरींचा राजकीय सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 09:33 IST

Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीच्या मुद्द्यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना एक राजकीय सल्ला दिला. 

Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात. जात, धर्माबद्दलही ते सातत्याने त्यांची मते मांडत असतात. रविवारी एका कार्यक्रमात राजकीय पक्षांमधील प्रत्येक जातीच्या सेलवरून नितीन गडकरींनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना सल्ला दिला. स्वतःच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात घेतलेल्या निर्णयाचा दाखला देत गडकरी म्हणाले की, 'मी केलेली चूक बावनकुळेंनी करू नये.'

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! भाजपच्या ४४ व्या स्थापनादिनी आयोजित कार्यक्रमादरम्यान रविवारी ते नागपुरात बोलत होते. गडकरी म्हणाले, 'भाजपचा प्रदेशाध्यक्ष असताना अनेक वरिष्ठांचा सल्ला न मानता मी विविध जातींचे सेल उघडले होते. सर्व जातींना पक्षासोबत जोडणे हेच त्यामागील उद्देश होता. मात्र, जाती जुळल्याच नाहीत व ती मोठी चूकच ठरली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ती चूक करू नये', असा सल्ला गडकरींनी बावनकुळेंना दिला. 

वाचा >>शिवसेनेच्या फुटीत तुमची भूमिका होती का? नितीन गडकरींनी काय दिले उत्तर?

'आता मनपा निवडणुकीदरम्यान विविध जातींच्या कार्यकर्त्यांना तिकीट देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पत्रे येतील, तेव्हा बावनकुळेंना माझ्या बोलण्याची गंभीरता लक्षात येईल. भाजप हीच आपली जात आहे, हे सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे', असा अशी भूमिका नितीन गडकरी यांनी यावेळी मांडली.  

काँग्रेसने भाजपबद्दल अपप्रचार केला

'भाजप हा जातीयवादी पक्ष नाही. मात्र, काँग्रेसने समाजाची दिशाभूल करून जनमानसात तसा अपप्रचार केला होता. भाजपला अनेक संघर्षातून जावे लागले व त्यातून तावून सुलाखून पक्ष समोर आला. आज जगातील सर्वांतमोठा राजकीय पक्ष आहे', अशी टीका गडकरींनी काँग्रेसवर केली. 

तितकेच प्रेम कार्यकर्त्यांवरही करा -गडकरी

'मुळात पक्ष हा परिवार आहे व नेत्यांनी सर्व कार्यकर्त्यांना तशीच वागणूक दिली पाहिजे. नेत्यांचे त्यांच्या मुलांवर प्रेम आहेच व अनेक जण तिकिटासाठी आग्रहदेखील करतात. मात्र, तेवढेच प्रेम कार्यकर्त्यांवरदेखील केले पाहिजे', असे खडेबोल गडकरींनी पक्षातील नेत्यांना सुनावले.

कम्युनिस्ट पक्षाची जागा घेतली विकत

कम्युनिस्ट पक्ष व हिंदू महासभेचे कार्यालय या जागेवर होते व ते विकत घेतले. अनेक भाडेकरूंना येथून रिकामे करून आता कार्यालयाचा मार्ग मोकळा झाला आहे. पक्ष कार्यकर्त्यांनी कार्यालयामागील भाव लक्षात घेतला पाहिजे, असा किस्सा गडकरींनी यावेळी सांगितला. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेPoliticsराजकारण