...अन गडकरींमधील फलंदाज जागा झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 07:00 IST2022-02-19T07:00:00+5:302022-02-19T07:00:16+5:30

Nagpur News गुरुवारी रात्री एका कार्यक्रमाच्या निमित्ताने रेशीमबाग मैदानावर गेले असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यातील लहानपणीचा फलंदाज जागा झाला व गडकरींनी फलंदाजी करण्याचा मनसोक्त आनंद लुटला.

... The batsman in Gadkari woke up | ...अन गडकरींमधील फलंदाज जागा झाला

...अन गडकरींमधील फलंदाज जागा झाला

ठळक मुद्देक्रिकेटच्या पिचवर फटकेबाजी

नागपूर : बालपणी ज्या मैदानावर खेळाचा आनंद लुटला, त्याच्याशी भावना जोडल्या गेलेल्या असतात. आयुष्यात व्यक्ती कितीही मोठी झाली तरी त्या मैदानावर पाऊल ठेवल्यावर बालपणीच्या आठवणी लगेच ताज्या होतात. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या बाबतीतही असे झाले. गुरुवारी रात्री एका कार्यक्रमाच्या निमित्ताने रेशीमबाग मैदानावर गेले असताना त्यांच्यातील लहानपणीचा फलंदाज जागा झाला व एरवी राजकारणाच्या पिचवर तुफान फटकेबाजी करणाऱ्या गडकरींनी फलंदाजी करण्याचा मनसोक्त आनंद लुटला.

माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे कोरोना काळात सर्वांसाठी झटलेले वैद्यकीय तज्ज्ञ, फार्मसिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियम लीग या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला भेट देण्यासाठी गडकरी रेशीमबाग मैदानावर पोहोचले. याच मैदानावर मी लहानपणी खूप क्रिकेट खेळलो व या स्पर्धेच्या निमित्ताने बालपणीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या आहेत, असे म्हणत गडकरींनी क्रिकेट पिचवर फटकेबाजीला सुरुवात केली. यावेळी माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. मोहन मते, भाजप वैद्यकीय आघाडीचे डॉ. गिरीश चरडे, डॉ. श्रीरंग वऱ्हाडपांडे, डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर, देवेन दस्तुरे व डॉ. प्रवीण पाटील हेदेखील उपस्थित होते.

Web Title: ... The batsman in Gadkari woke up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.