गांजा बाळगणाऱ्या आरोपीला अटक
By दयानंद पाईकराव | Updated: March 3, 2024 19:33 IST2024-03-03T19:33:33+5:302024-03-03T19:33:46+5:30
गांजा बाळगणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने अटक केली आहे.

गांजा बाळगणाऱ्या आरोपीला अटक
नागपूर: गांजा बाळगणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने अटक केली आहे. सुरज संजय खोब्रागडे (३०, रा. सुरजनगर, भांडेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे अधिकारी व कर्मचारी शनिवारी रात्री ८.१५ वाजता गुन्हेगाराच्या शोधात गस्त घालत असताना त्यांना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरजनगर येतील मोकळ्या मैदानाजवळ एक व्यक्ती गांजा विकत असल्याची माहिती मिळाली.
पोलिस तेथे गेले असता आरोपी पळून जात होता. पोलिसांनी त्यास पकडून त्याच्या हातातील पांढरी पिशवी तपासली असता त्यात १७७० रुपये किमतीचा १७७ ग्रॅम गांजा आढळला. आरोपीकडून ५ हजार रुपये रोख, मोबाईल असा एकुण १६ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.