शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

... म्हणून अमरावती जिल्ह्यातल्या देऊरवाडात घरावर कौले लावीत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 16:24 IST

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: एखाद्या गावाला असलेला इतिहास आणि त्या गावाची परंपरा यांचे एकमेकांसोबतचे नाते काळासोबतच पावले टाकून चालत असते. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात असलेल्या देऊरवाडा या गावानेही इतिहासासोबतचे आपले नाते वर्तमानातही जपण्याचा वसा कायम राखला आहे.देऊरवाडा म्हणजेच देवळांचा वाडा अर्थात देवांचा वाडा. या गावातून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या किनाऱ्यावर अनेक देवळे ...

ठळक मुद्देसाडेअकरा शिवलिंगांचे मंदीर

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: एखाद्या गावाला असलेला इतिहास आणि त्या गावाची परंपरा यांचे एकमेकांसोबतचे नाते काळासोबतच पावले टाकून चालत असते. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात असलेल्या देऊरवाडा या गावानेही इतिहासासोबतचे आपले नाते वर्तमानातही जपण्याचा वसा कायम राखला आहे.देऊरवाडा म्हणजेच देवळांचा वाडा अर्थात देवांचा वाडा. या गावातून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या किनाऱ्यावर अनेक देवळे पहावयास मिळतात.या गावातील नागरिक आपल्या घरांवर कौले लावीत नाहीत. कुठल्याही धर्मचा, जातीचा वा आर्थिक स्तराचा नागरिक असो, तो आपल्या घरावर त्याच्या ऐपतीनुसार छप्पर घालतो. मात्र त्यात कौलांचा समावेश कधीच नसतो.प्रथम ऐकताना अतिशय नवलाची वाटणारी ही बाब असली तरी त्याचे उगमस्थान हे पुराणकाळात दडले असल्याचे नंतर आख्यायिकेतून कळते.आपण सर्वांनी लहानपणी ऐकलेली हिरण्यकश्यपूची गोष्ट जर आठवली तर नरसिंहाने कसे त्याचे पोट फाडले हे आठवावे. तर त्या राक्षसाचे पोट फाडून त्याला ठार केल्यानंतर नरसिंहाने आताच्या देऊरवाडातून वाहणाऱ्या पूर्णा नदीत आपले हात धुतले होते असे सांगतात. त्याची ती रक्ताळलेली नखे ही कौलांसारखी दिसत होती. एका असुराचा नाश केलेली व रक्ताळलेली नखे आपल्या घरावर नको या भावनेमुळे तेथील गावकरी आपल्या घरांवर कौले लावीत नाहीत.या गावात नरसिंहाचे एक अतिशय सुंदर मंदिर आहे. नदीच्या काळावर एका काठावर नरसिंहाचे तर दुसऱ्या काठावर साडेअकरा शिवलिंगांचे मंदिर आहे. ही शिवलिंगे याच नदीच्या पात्रातून बाहेर आल्याचे सांगितले जाते.पुराणकाळातील ही कथा आजच्या विज्ञानयुगात सुसंगत वाटणारी नसली तरी देऊरवाडातील नागरिक तिला मान्यता देतात. जर या आख्यायिकेला विरोध करण्यासाठी कुणी आपल्या घरावर कौले लावलीच तर ते घर लवकरच भंगते, पडते वा त्या घरातील सदस्यांवर सतत अरिष्टे येतात अशीही वदंता आहे.चांदूरबाजार हा तालुका तसा अमरावती जिल्ह्यातील एक सधन तालुका. येथे पावसाचे प्रमाणही तुलनेत अधिक असते. सामान्यपणे जिथे पाऊस जास्त असतो तिथे कौलारू घरे अधिक पहावयास मिळतात. अपवाद फक्त एकच, अमरावती जिल्ह्यातले देऊरवाडा.

टॅग्स :cultureसांस्कृतिक