शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तो' टाइपरायटर धूळखात ! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा टाइपरायटर अंधाऱ्या खोलीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:23 IST

Nagpur : बाबासाहेबांच्या वस्तू असलेले वस्तुसंग्रहालय अद्याप नवीन इमारतीत स्थलांतरित झालेले नाही.

योगेंद्र शंभरकर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या टाइपरायटरच्या आधारे संविधानाचा मसुदा तयार केला होता. तो टाइपरायटर चार वर्षांपासून बंद खोलीत धूळखात आहे. चिचोली शांतीवन येथील बाबासाहेब आंबेडकर स्मृती संग्रहालयातून टाइपरायटर रासायनिक प्रक्रियेसाठी बाहेर काढण्यात आले होते. त्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. परंतु अनुकूल वातावरण नसल्याने टाइपरायटर पुन्हा प्रदर्शनात ठेवता येत नाही. यामुळे २६ जानेवारीला राज्यघटनेच्या ७५ व्या वर्धापनदिनी हा ऐतिहासिक टाइपरायटर लोकांच्या नजरेपासून दूरच राहिले. 

संग्रहालय चालवणाऱ्या भारतीय बौद्ध परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या ऐतिहासिक टाइपरायटर आणि इतर वस्तूंच्या जतनासाठी आवश्यक तापमान राखण्यासाठी एअर कंडिशनर (एसी) यंत्रणा बसवणे आवश्यक आहे. या वस्तूंच्या देखभालीसाठी शांतीवन, चिचोली येथील जागेत प्रयोगशाळा उभारणे आवश्यक आहे.

बाबासाहेब आंबेडकर स्मृती संग्रहालयातील मौल्यवान वस्तूंचे जतन करण्यासाठी निधीची भारतीय बौद्ध परिषदेकडून अनेक वर्षांपासून मागणी होत होती, अखेर २०११ मध्ये शासनाने ४० कोटी रुपये मंजूर केले. यातून बाबासाहेबांचे टाइपरायटर, कपडे, चष्मा, काठी, पेन, कंदील, कागदपत्रांसह सुमारे १३५८ वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आहे. एनआयटीने संग्रहालय इमारतीचे बांधकाम केले आहे. शासनाने १७ कोटींचा निधी देऊन इतर इमारती बांधल्या. मात्र या इमारतींमध्ये फर्निचर, शोकेस आणि इतर आवश्यक सुविधांचा अभाव आहे.

बाबासाहेबांच्या वस्तू असलेले वस्तुसंग्रहालय अद्याप नवीन इमारतीत स्थलांतरित झालेले नाही.रासायनिक प्रक्रिया करूनही गेल्या ४-५ वर्षांपासून वस्तू एका छोट्या खोलीत ठेवल्या आहेत. योग्य वातावरण तयार न झाल्यास हा वारसा पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे.

"बाबासाहेबांनी या टाइपरायटरवर २ वर्षे ११ महिने १८ दिवस संविधान टाइप केलेले टाइपरायटर चिचोली संग्रहालयात आहे. त्यावर रासायनिक प्रक्रिया आणि संग्रहालयाच्या इमारतीचे बांधकाम झाले आहे. परंतु ऐतिहासिक वस्तूसाठी अनुकूल वातावरण व सुविधा उपलब्ध नाहीत. विकासकामांसाठी १७४ कोटींचा प्रस्ताव परिषदेने दिला होता. मात्र शासनाने निधी दिला नाही. बाबासाहेबांच्या वस्तू एका खोलीत बंद आहेत. राज्य सरकारने किमान ६० कोटींचा निधी द्यावा, अन्यथा वस्तू पुन्हा खराब होतील." - संजय पाटील, भारतीय बौद्ध परिषद, शांतीवन, चिचोली

टॅग्स :nagpurनागपूर