शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी; मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी! म्हणाल्या, "मला विश्वास नाही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 10:20 IST

आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

Sushma Andhare : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नागपूर विमानतळावर हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. सुषमा अंधारे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. यावेळी सुषमा अंधारे याच्यासोबत त्यांची सात वर्षांची मुलगी देखील होती. या सगळ्या प्रकारानंतर सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे. तसेच शासनाच्या सुरक्षेवर आपला विश्वास नसल्याचेही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे मंगळवारी नागपुरात पोहोचल्या होत्या. यावेळी विमानतळावरुन बाहेर पडत असतानाच एका व्यक्तीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. तसेच त्यानंतर ती व्यक्ती जय श्री रामच्या घोषणा देत तिथून निघून गेल्याचेही अंधारे यांनी म्हटलं आहे. त्यांनी फेसबुक पोस्टमधून या घटनेची माहिती दिली आहे.

"परभणी प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी सभागृहात आणि बाहेर संघर्ष चालु आहे. अशातच आत्ता 3 वाजून 36 मिनिटांनी नागपूर विमानतळावर departure gate ला विचित्र घटना घडली. मी, माझी  ७ वर्षांची लेक आणि समता सैनिक दलाच्या ऍड. स्मिता कांबळे यांच्या समवेत होते. साधारण ६ फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला, समोरून अर्धे टक्कल असणारा माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता. नेहमी प्रमाणे कुणीतरी ओळखीचा असावा म्हणुन वर बघितले तर तो जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. गेट वरील सुरक्षा रक्षक थोडे पुढे सरसावले तसा तो जय श्रीराम च्या घोषणा देत भरधाव गाडीने निघून गेला," असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. 

"देवेंद्र जी ,आपण आपल्या यंत्रणेकडून या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती तपासावी. हा घटनाक्रम इथे लिहू नये असे खुपदा वाटले. मात्र दहशत आणि दबावतंत्राचे हे गलिच्छ राजकरण मुख्यमंत्री म्हणून आपल्यापर्यंत पोचवणे ही नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे असे वाटले. टीप शासनाने मला सुरक्षा पुरवावी असे अजिबात वाटत नाही. कारण त्यावर माझा फारसा विश्वास नाही. बाकी आपली मर्जी," असेही सुषमा अंधारेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. 

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेnagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस