शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

‘आरडीएसओ’ चमूतर्फे मेट्रो प्रकल्पाचे परीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 22:06 IST

महामेट्रो नागपूर प्रकल्पाची प्रवासी सेवा लवकरच सुरू होणार असून या अनुषंगाने ‘आरडीएसओ’च्या (संशोधन डिझाईन आणि मानक संघटना) अधिकाऱ्यांचे पथक शुक्रवारी नागपुरात दाखल झाले आणि लगेचच त्यांनी मेट्रो प्रकल्पाचे परीक्षण सुरू केले. आरडीएसओच्या परीक्षणानंतर मेट्रो रेल्वे रुळावर धावणार आहे.

ठळक मुद्देदोन दिवस परीक्षण : एअरपोर्ट ते काँग्रेसनगरपर्यंत चाचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोनागपूर प्रकल्पाची प्रवासी सेवा लवकरच सुरू होणार असून या अनुषंगाने ‘आरडीएसओ’च्या (संशोधन डिझाईन आणि मानक संघटना) अधिकाऱ्यांचे पथक शुक्रवारी नागपुरात दाखल झाले आणि लगेचच त्यांनी मेट्रो प्रकल्पाचे परीक्षण सुरू केले. आरडीएसओच्या परीक्षणानंतर मेट्रो रेल्वे रुळावर धावणार आहे.पथकाने सर्वप्रथम महामेट्रो नागपूरच्या वर्धा मार्गवरील एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते काँग्रेसनगर मेट्रो स्टेशनदरम्यान झालेल्या कार्याची ‘आरआरव्ही’च्या (रेल कम रोड व्हेईकल) माध्यमाने पाहणी केली. या अंतर्गत मेट्रो ट्रॅक, ओव्हर हेड ओएचई, मेट्रो स्टेशन्स आणि इतर महत्त्वाच्या घटकांची चाचणी आरडीएसओच्या चमूने केली. चाचणी करीत असताना महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाशी संबंधित सर्व माहिती प्रदान केली.‘आरडीएसओ’ची चाचणी काही दिवस सुरू राहणार असून यात ब्रेक सिस्टीम, निर्वासन प्रणाली आणि इतर सर्व उपकरणांची तपासणी करणार आहेत. तसेच चीन येथून आलेल्या नागपूर मेट्रो कोचेसने प्रवास करून आरडीएसओ पुढील परीक्षण करेल. उल्लेखनीय आहे की, लाँचिंगसाठी महामेट्रोनी आपली तयारी पूर्ण केली आहे, मेट्रो ट्रॅक, ओव्हर हेड ओएचई, सिग्नलिंग व कम्युनिकेशन प्रवासी वाहतूक सुविधा आदी विषयांची तयारी पूर्ण झाली आहे. महामेट्रोतर्फे अनेक महिन्यापासून अविरत कार्य सुरू आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर