शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 10:54 PM

Testimony to register FIR against Bhangadia, nagpur news नागपूर सुधार प्रन्यासद्वारे बेघर नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या गृह प्रकल्पांमध्ये खोटी माहिती देऊन सदनिका मिळवण्याच्या प्रकरणात चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १९९, २०० व ४२० अंतर्गत एफआयआर नोंदवण्याची ग्वाही इमामवाडाचे पोलीस निरीक्षक एम. एम. साळुंखे व सक्करदराचे पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी शुक्रवारी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. एम. देशमुख यांना दिली.

ठळक मुद्देबेघर नागरिकांच्या गृह प्रकल्पांमध्ये सदनिका मिळवण्याचे प्रकरण

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासद्वारे बेघर नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या गृह प्रकल्पांमध्ये खोटी माहिती देऊन सदनिका मिळवण्याच्या प्रकरणात चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १९९, २०० व ४२० अंतर्गत एफआयआर नोंदवण्याची ग्वाही इमामवाडाचे पोलीस निरीक्षक एम. एम. साळुंखे व सक्करदराचे पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी शुक्रवारी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. एम. देशमुख यांना दिली.

सदर प्रकरणात या न्यायालयाने गेल्या २४ डिसेंबर रोजी ॲड. तरुण परमार यांचे दोन अर्ज मंजूर करून इमामवाडा व सक्करदरा पोलीस निरीक्षकांना भांगडिया यांच्याविरुद्ध संबंधित गुन्ह्यांतर्गत एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते. २८ डिसेंबर रोजी दोन्ही पोलीस निरीक्षकांना त्या आदेशाची माहिती देण्यात आली होती. त्यानंतरही त्यांनी एफआयआर नोंदवले नाही. परिणामी, ॲड. परमार यांनी दोन्ही पोलीस निरीक्षकांवर अवमानना कारवाई करण्यासाठी नवीन अर्ज दाखल केले. त्यात न्यायालयाने दोन दिवसापूर्वी दोन्ही पोलीस निरीक्षकांना नोटीस बजावून भांगडिया यांच्याविरुद्ध एफआयआर का नोंदवला नाही अशी विचारणा केली होती व यावर शुक्रवारी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दोन्ही पोलीस निरीक्षकांनी विविध कारणे सांगून स्वत:ची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते न्यायालयाचे समाधान करू शकले नाही. शेवटी न्यायालयाने कडक भूमिका घेतल्यानंतर त्यांनी भांगडिया यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची ग्वाही दिली. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणावर येत्या मंगळवारी पुढील सुनावणी निश्चित केली. त्या सुनावणीत पोलिसांनी ग्वाहीचे पालन केले किंवा नाही, याची माहिती घेतली जाईल. अर्जदारातर्फे ॲड. सतीश उके व ॲड. वैभव जगताप यांनी कामकाज पाहिले.

असे आहे प्रकरण

कीर्तीकुमार भांगडिया यांच्या पत्नी सोनल यांनी उंटखानामधील दहीपुरा येथील नासुप्र लोकगृह निर्माण योजनेतील टू-बीएचके सदनिका (इमारत - एबी, गाळा क्र. ३०१) मिळवली आहे. त्यांच्याकडे २४ सप्टेंबर २००७ पासून त्या सदनिकेचा ताबा आहे. त्यानंतर कीर्तीकुमार भांगडिया यांनी या योजनेतील दुसरी टू-बीएचके सदनिका (इमारत - एबी, गाळा क्र. ३०३) आणि सक्करदरामधील आयुर्वेदिक ले-आऊट येथील नासुप्र गृह योजनेतील थ्री-बीएचके सदनिका (इमारत - डी, गाळा क्र. २०२) मिळवली. त्यांच्याकडे दहीपुरा येथील सदनिकेचा २५ जून २००८ पासून तर, आयुर्वेदिक ले-आऊट येथील सदनिकेचा ९ एप्रिल २००९ पासून ताबा आहे. या दोन्ही सदनिका मिळविताना त्यांनी स्वत:सह पत्नी व मुलांच्या नावाने नागपूर महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यास हद्दीमध्ये घर, गाळे किंवा भूखंड नसल्याची खोटी माहिती लिहून दिली असे परमार यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Courtन्यायालयPoliceपोलिस