शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

रेल्वेस्थानकावर दहशतवादी शिरले अन् ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2023 10:29 PM

Nagpur News शनिवारी सायंकाळी वेळ ४.३५ वाजताची. अचानक एक मारुती व्हॅन रेल्वेस्थानक परिसरात शिरते. त्यात कथित दहशतवादी असल्याचा संदेश आधीच रेल्वे पोलिसांना मिळालेला असतो. त्यामुळे रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा दल, दहशतवादविरोधी पथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक असे सारेच सज्ज असतात.

नरेश डोंगरे नागपूर : शनिवारी सायंकाळी वेळ ४.३५ वाजताची. अचानक एक मारुती व्हॅन रेल्वेस्थानक परिसरात शिरते. त्यात कथित दहशतवादी असल्याचा संदेश आधीच रेल्वे पोलिसांना मिळालेला असतो. त्यामुळे रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा दल, दहशतवादविरोधी पथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक असे सारेच सज्ज असतात. चोहोबाजूंनी मारुती व्हॅनची घेराबंदी केली जाते. सशस्त्र जवान सावधगिरीने पुढे होतात अन् अखेर व्हॅनमधून दोघांना बाहेर काढले जाते. एक-सव्वा तासाच्या धावपळीनंतर आता रेल्वेस्थानक परिसराला दहशतवाद्यांचा धोका नसल्याचे जाहीर केले जाते. दरम्यान, सशस्त्र पोलिसांची फाैज आणि ती मारुती व्हॅन तसेच त्यातील तरुणांना अटक करण्याचे नाट्य पाहून काहीतरी विपरीत होत असल्याच्या शंकेमुळे उत्कंठता ताणून असलेल्या शेकडो प्रवाशांना ही 'मॉक ड्रिल' असल्याचे सांगितले जाते आणि ते सुटकेचा नि:श्वास टाकतात.

नागपूरचे मध्यवर्ती रेल्वेस्थानक दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे; त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्था कशी आहे, त्याचा वेळोवेळी आढावा घेतला जातो. वरिष्ठांकडून वारंवार सुरक्षा व्यवस्थेची चाचपणीही केली जाते. याच पार्श्वभूमीवर, दहशतवादविरोधी पथकाचे अधीक्षक (मुंबई) यांनी रेल्वेस्थानकावर अचानक अशी स्थिती निर्माण झाल्यास काय करायचे, कसे करायचे, त्याची प्रत्यक्ष कृतीतून माहिती देण्यासाठी रंगीत तालीम (मॉक ड्रिल) घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आज सायंकाळी ४:३५ वाजता दहशतवादविरोधी पथक (एटीएस), रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस), सीआयबी, सीताबर्डी पोलिस तसेच अग्निशमन दलाचा ताफा रेल्वेस्थानकावर पोहोचला आणि मॉक ड्रिलला सुरुवात झाली. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात सशस्त्र पोलिस आणि मारुती व्हॅनमधून सिनेस्टाइल ताब्यात घेण्यात आलेल्या कथित दहशतवाद्यांमुळे शेकडो प्रवाशांच्या मनात शंका-कुशंका निर्माण झाल्या होत्या. सायंकाळी ५.५५ वाजता मॉक ड्रिल आटोपल्यानंतर एटीएसच्या अधिकाऱ्यांनी काय वास्तव आहे, ते जाहीर केले. त्यानंतर प्रवाशांची गर्दी पांगली.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर