शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

‘एनआयए’चे नागपुरात चार ठिकाणी धाडसत्र, ‘गझवा-ए-हिंद’ प्रकरणात चौघांची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 07:16 IST

गुरुवारी पहाटे एनआयए पथकाने गवळीपुरा येथील रहिवासी फरहान अली लियाकत अली, सतरंजीपुरा येथील मो. अख्तर रजा, मुख्तार रैन व अब्दुल मुख्तादीर, अब्दुल गुलाम मुस्तफा व कुही येथील जमील कुरेशी यांच्या घरावर छापे टाकले.

नागपूर : राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) पथकाने गुरुवारी नागपूर जिल्ह्यात चार ठिकाणी ‘सर्च ऑपरेशन’ राबविल्याने खळबळ उडाली. शहरात तीन ठिकाणी तीन जणांची चौकशी करण्यात आली. तर जवळच्या कुही-मांढळमधील मोबाइल विक्रेत्याची झाडाझडती घेण्यात आली.  देशविरोधी कृत्य आणि धार्मिक कट्टरता पसरवणारे दहशतवादी मॉड्यूल ‘गझवा-ए-हिंद’ प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. 

गुरुवारी पहाटे एनआयए पथकाने गवळीपुरा येथील रहिवासी फरहान अली लियाकत अली, सतरंजीपुरा येथील मो. अख्तर रजा, मुख्तार रैन व अब्दुल मुख्तादीर, अब्दुल गुलाम मुस्तफा व कुही येथील जमील कुरेशी यांच्या घरावर छापे टाकले. छापे पडले, त्या वेळी चाैघेही झोपले होते. एनआयए टीम आणि पोलिसांना पाहून त्यांना धक्काच बसला. झडतीत मोबाइल, लॅपटॉप, पेन ड्राइव्ह आणि कागदपत्रे सापडली. मोबाइल जप्त करण्यात आले. पाकिस्तानमधील संघटनांशी दोघांचे बोलणे झाले होते का, याची चाैकशी करण्यात येत आहे. 

मध्य प्रदेश, गुजरातमध्येही टाकल्या धाडीगझवा-ए-हिंदचे बिहारमधील दहशतवादी जाळे गेल्या वर्षी उद्ध्वस्त केल्यानंतर या प्रकरणी पुढील तपासासाठी एनआयएने गुरुवारी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांतही धाडी घातल्या. मध्य प्रदेशात ग्वाल्हेर, गुजरात राज्यातील वलसाड, सुरत जिल्ह्यात घातलेल्या धाडींमध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

कारवाईदरम्यान काही वेळ तणावएनआयएच्या पथकाने पहाटे चार वाजता चार संशयितांच्या घराला घेराव घातला. सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांना ‘अलर्ट’ मोडमध्ये ठेवण्यात आले होते. एनआयए अधिकारी व पोलिस पाहून दोन संशयितांचे नातेवाईक संतप्त झाले. विनाकारण गोवण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाnagpurनागपूर