सीमेवर तणाव, संरक्षण मंत्री संघ भेटीला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 22:46 IST2018-05-24T22:09:15+5:302018-05-24T22:46:00+5:30

केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देऊन रा. स्व.संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची भेट घेतली. त्यांचा कुठलाही शासकीय कार्यक्रम नसताना त्या अचानकपणे नागपूर दौऱ्यावर आल्या. पाकिस्तानच्या लष्कराकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर संघाशी सल्लामसलत करण्यासाठी त्या आल्या असाव्यात, असा अंदाज वर्तविला जात आहे.

Tensions on the border, defense minister visited RSS Head Quarter | सीमेवर तणाव, संरक्षण मंत्री संघ भेटीला 

सीमेवर तणाव, संरक्षण मंत्री संघ भेटीला 

ठळक मुद्दे निर्मला सीतारामन यांनी घेतली आरएसएसचे सरकार्यवाह भय्याजी जोशींची भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देऊन रा. स्व.संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची भेट घेतली. त्यांचा कुठलाही शासकीय कार्यक्रम नसताना त्या अचानकपणे नागपूर दौऱ्यावर आल्या. पाकिस्तानच्या लष्कराकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर संघाशी सल्लामसलत करण्यासाठी त्या आल्या असाव्यात, असा अंदाज वर्तविला जात आहे.
निर्मला सीतारामन यांनी रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराला भेट दिली. तेथे त्यांनी रा. स्व. संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी उपस्थित होते. त्यानंतर सीतारामन यांनी भय्याजी जोशी यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. या भेटीत काय चर्चा झाली हे कळू शकले नाही. मात्र, पाकिस्तानच्या कुरापतींमुळे सीमेवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: Tensions on the border, defense minister visited RSS Head Quarter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.