शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

महिला मेळाव्यावरून नागपूर जिल्हा परिषद सभागृहात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 21:48 IST

महिला मेळावा रद्द केल्याचे पडसाद जिल्हा परिषद बजेटच्या सभेत तीव्रपणे उमटले. बजेट सुरु होण्यापूर्वीच महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीसह सर्व सदस्यांनी सभागृहात खाली बसून ठिय्या दिला. किमान तासभर समितीच्या सभापतीसह सदस्यांनी अध्यक्षासह काँग्रेसचे सदस्य शिवकुमार यादव यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. त्यामुळे सभागृहात चांगलाच तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देसमितीच्या सदस्यांनी सभापतीसह दिला ठिय्या : अध्यक्षांसह, काँग्रेस सदस्यांवर आगपाखड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला मेळावा रद्द केल्याचे पडसाद जिल्हा परिषद बजेटच्या सभेत तीव्रपणे उमटले. बजेट सुरु होण्यापूर्वीच महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीसह सर्व सदस्यांनी सभागृहात खाली बसून ठिय्या दिला. किमान तासभर समितीच्या सभापतीसह सदस्यांनी अध्यक्षासह काँग्रेसचे सदस्य शिवकुमार यादव यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. त्यामुळे सभागृहात चांगलाच तणाव निर्माण झाला होता.२८ जानेवारीला जिल्हास्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन महिला व बाल कल्याण समितीने केले होते. २५ जानेवारीला विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भागवत तांबे यांनी मेळावा रद्द करण्याचे पत्र समितीला दिले. त्यामुळे समितीच्या सदस्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांनी कुणाच्या तरी दबावात ऐनवेळी मेळावा रद्द केल्याचा रोष समितीच्या सदस्यांमध्ये होता. गुरुवारी झालेल्या बजेटच्या बैठकीत त्यांनी आपला रोष सभागृहात प्रकट केला. समितीच्या सभापती पुष्पा वाघाडे यांनी सभागृहाच्या डायसवरून उतरून खाली बसल्या. त्यांच्यासोबत छाया ढोले, कुंदा आमधरे, अरुणा मानकर, कल्पना चहांदे, रत्नमाला इरपाते या सदस्यांनीही खाली ठिय्या दिला. मेळावा रद्द करण्याचे अधिकाऱ्यांनी कारण सांगावे अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी भूमिका समितीच्या सदस्यांनी घेतली. सदस्यांनी अधिकाऱ्यांला कटघऱ्यात घेतले. नियोजन झाले नव्हते तर समितीची दिशाभूल का केली, असा सवाल अधिकाऱ्यांना केला. अध्यक्षाच्या केबिनमधून काँग्रेस सदस्य शिवकुमार यादव यांनी महिला मेळाव्यासंदर्भात सभापतींना का फोन केला? यावरही समितीच्या सदस्यांनी रोष दर्शविला. दरम्यान अध्यक्षाला मान न दिल्यामुळे मेळावा रद्द झाल्याचा मुद्दा सुद्धा सभागृहात उपस्थित झाला. यावरून सदस्यांनी अध्यक्षांवरही रोष दर्शविला. अध्यक्षांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा आग्रह थरला. प्रभारी सीईओंनी तसे रुलिंगही नोंदवून घेतले. पण समितीच्या सदस्यांनी चौकशीला विरोध केला आणि अधिकाऱ्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली. अखेर अधिकाऱ्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केल्यानंतर या नाट्याला विराम मिळाला. इतर महिला सदस्य मूकदर्शकस्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण मिळाल्यामुळे सभागृहात महिलांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. असे असतानाही महिलांच्या अस्मितेच्या प्रश्नावरही समितीचे सदस्य सोडल्यास इतर महिला मूक होत्या. महिलांचे अधिकार डावलले जात असतानाही, एकही महिला सदस्य समितीच्या सदस्यांच्या बाजूने उभी झाली नाही. शेवटी शिवसेनेच्या भारती गोडबोले व काँग्रेसच्या नंदा नारनवरे यांनी समितीच्या सदस्यांना साथ दिली. बाकी महिला सदस्य मूकदर्शक बनून तमाशा बघत होत्या.सभापतींना हक्कासाठी मागावा लागतो न्यायजि.प.च्या इतिहासात पहिल्यांदा सभापतीला आपल्या मागणीसाठी सभागृहात खाली बसावे लागले, हे सत्तापक्षाचे दुर्दैव असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते मनोहर कुंभारे यांनी केला. जिल्हा परिषदेत चालले काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूर