कामठी पोलीस ठाण्यासमोर तणाव
By Admin | Updated: June 6, 2014 00:51 IST2014-06-06T00:51:52+5:302014-06-06T00:51:52+5:30
कत्तलखान्याकडे जाणार्या ३0 जनावरांना बजरंग दलाच्या स्थानिक पदाधिकार्यांनी कामठी पोलीस ठाण्याच्या आवारात आणले. दरम्यान, सदर जनावरे आपल्या मालकीची असल्याने ती सोडण्यात यावी,

कामठी पोलीस ठाण्यासमोर तणाव
दोन गट आमने-सामने : ३0 जनावरांना जीवनदान
कामठी : कत्तलखान्याकडे जाणार्या ३0 जनावरांना बजरंग दलाच्या स्थानिक पदाधिकार्यांनी कामठी पोलीस ठाण्याच्या आवारात आणले. दरम्यान, सदर जनावरे आपल्या मालकीची असल्याने ती सोडण्यात यावी, अशी मागणी स्थानिक कुरेश समाजातील काही नागरिकांनी केली. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरापर्यंंत या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पोलिसांसमोर दोन्ही गटात चर्चा सुरू होती.
बजरंग दलाचे नागपूर शाखेचे प्रमुख राजकुमार जतिराम शर्मा (४0) हे गुरुवारी दुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास लग्नाकरिता कारने नागपूरहून कन्हानला जात होते. दरम्यान, त्यांना नागपूर-कामठी मार्गावरील कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमना टी पॉईंटजवळ अशफाक कुरेशी नजीर कुरेशी (१८), शेख जब्बार शेख मस्तान (३६) व शेख इरफान कुरेशी (१८) तिघेही रा. टेका नाका (नवीन वस्ती), नागपूर हे तिघेही ३0 बैल कामठीकडे घेऊन जात असल्याचे राजकुमार शर्मा यांच्या निदर्शनास आले. शर्मा यांना संशय आल्याने त्यांनी या तिघांनाही सदर बैलाबाबत विचारणा केली. सदर बैल आपण खरेदी केल्याचे त्यांनी शर्मा यांना सांगितले. मात्र, ते कुठून व कुणाकडून खरेदी केले, हे मात्र सांगितले नाही. या तिघांनीही बैल खरेदीचा पुरावा न दाखविल्याने तसेच विचारलेल्या प्रश्नांची असमाधानकारक उत्तरे दिल्याने राजकुमार शर्मा यांनी या प्रकाराची माहिती भ्रमणध्वनीवर कामठी पोलिसांना दिली. कामठी पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून बैलांना ताब्यात घेत व पोलीस ठाण्याच्या आवारात आणले. काही वेळातच कामठी येथील कुरेश समाजाचे काही नागरिक पोलीस ठाण्यात आणले. ही जनावरे आपल्या मालकीची असल्याने ती सोडून देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी रेटून धरली होती.
काहींनी ही जनावरे बळजबरीने सोडून नेण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सतर्कतेमुळे हा प्रयत्न हाणून पाडला. दुपारी १.३0 वाजताच्या सुमारास कामठी येथील कत्तलखान्याशी संबंधित असलेले काही नागरिक पुन्हा पोलीस ठाण्याच्या आवारात आले. त्यांनीही सदर बैल सोडण्याची मागणी केली. जयराज नायडू यांच्या नेतृत्वात बजरंग दलाचे स्थानिक व नागपूर येथील काही कार्यकर्ते पोलीस ठाण्यात पोहोचले. (तालुका प्रतिनिधी)