शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सांगा! शेतकऱ्यांना ४ हजार ४४४ रुपये मीटरनुसार भरपाई देता का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 11:53 IST

Nagpur : हायकोर्टाची धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चरला विचारणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसी येथील पॉवर स्टेशनच्या पाणी पाईपलाईनसाठी शेतजमीन वापरण्यात आल्यामुळे पीडित शेतकऱ्यांना ४ हजार ४४४ रुपये प्रती मीटरनुसार भरपाई देता का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व जिल्हाधिकारी यांना करून यावर येत्या १७ जूनपर्यंत उत्तर मागितले.

यासंदर्भात अंतुर्ला येथील अशोक कौरासे व इतर चार पीडित शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व तृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, याचिकाकर्त्याच्या वकील अॅड. शिल्पा गिरटकर यांनी नुकसानीचा पंचनामा करणाऱ्या तहसीलदारांवर गंभीर आरोप केले. भरपाई निश्चित करताना तहसीलदार व धारीवाल कंपनी यांनी संगनमत केले होते. कंपनीने सर्वेक्षणाच्या तीन दिवसापूर्वीपासून पाणी पाईपलाईन बंद ठेवली होती. त्यानंतर तहसीलदारांनी १३ डिसेंबर २०२४ रोजी पंचनामा करून शेतपिकांचे केवळ पाच टक्के नुकसान झाल्याचा अहवाल दिला. याशिवाय, पाईपलाईनसाठी वापरण्यात आलेल्या शेतजमिनीकरिता भरपाई देण्याचा विचारच करण्यात आला नाही, असे अॅड. गिरटकर यांनी न्यायालयाला सांगून पीडित शेतकऱ्यांना ४ हजार ४४४ रुपये प्रती मीटरनुसार भरपाई देण्याची मागणी केली. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता संबंधित निर्देश दिले. 

२० किलोमीटर लांब पाईपलाईनजल संसाधन विभागाने ६०० मेगावॅट क्षमतेच्या धारीवाल पॉवर स्टेशनला वर्धा नदीमधील पाणी वापरण्यास तर, जिल्हाधिकाऱ्यांनी पॉवर स्टेशनपर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी शिवधुऱ्यावरून पाईपलाईन टाकण्यास परवानगी दिली होती. परंतु, कंपनीने शिवधुन्ऱ्यासह शेतातूनही सुमारे २० किलोमीटर लांब पाईपलाईन टाकली आहे. ही पाईपलाईन अनेकदा फुटते. त्यामुळे शेतपिकांचे नुकसान होते.

टॅग्स :nagpurनागपूर