शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
4
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
5
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
6
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
7
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
8
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
9
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
10
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
11
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
12
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
13
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
14
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
15
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
16
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
17
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
18
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
19
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
20
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?

विभागीय समायोजन प्रक्रियेवर शिक्षकांचा आक्षेप : संघटनांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 1:06 AM

विभागातील शासकीय अनुदानित शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया बुधवारी सरस्वती विद्यालयात पार पडली. ही प्रक्रिया सदोष असल्याचा ठपका ठेवत शिक्षक संघटनांनी प्रक्रियेदरम्यान गोंधळ घातला. संघटनांच्या मते विभागीय समायोजनाची प्रक्रिया पार पाडण्यापूर्वी जिल्ह्यातील समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी शिक्षकांची मागणी होती. यावेळी शिक्षकांनी विकल्प पत्र भरून देण्यावरही आक्षेप घेतला.

ठळक मुद्दे आधी जिल्ह्यातील समायोजन प्रक्रिया पार पाडण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विभागातील शासकीय अनुदानित शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया बुधवारी सरस्वती विद्यालयात पार पडली. ही प्रक्रिया सदोष असल्याचा ठपका ठेवत शिक्षक संघटनांनी प्रक्रियेदरम्यान गोंधळ घातला. संघटनांच्या मते विभागीय समायोजनाची प्रक्रिया पार पाडण्यापूर्वी जिल्ह्यातील समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी शिक्षकांची मागणी होती. यावेळी शिक्षकांनी विकल्प पत्र भरून देण्यावरही आक्षेप घेतला.शिक्षक संघटनांच्या मते विभाग स्तरावर समाजायोजनाची प्रक्रिया संच मान्यता २०१८-१९ न करता २०१७-१८ च्या संचमान्यतेच्या आधारावर समायोजनाची प्रक्रिया पार पाडली. त्यामुळे जिल्ह्यात रिक्त जागा असतानाही, जिल्ह्याबाहेर शिक्षकांना जाण्याचा धोका निर्माण झाला. अनेक शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेत, संवर्गात तसेच नियुक्ती दिनांकात चुका असतानाही दुरुस्तीसाठी वाजवी संधी देण्यात आली नाही, यावर संघटनेने आक्षेप घेऊन, शिक्षक उपसंचालकांचा घेराव केला.काही संघटनांनी आक्षेप घेतला की, जिल्ह्यातील खाजगी अनुदानित शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जि.प.च्या शाळांमध्ये करण्याचे शासनाचे आदेश आहे. नागपूर जिल्ह्यात शासनाच्या आदेशाचे पालन करण्यात आले आहे. पण चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यामध्ये समायोजनाची प्रक्रिया जिल्हानिहाय संपूर्ण पार पडली नाही. तरीही विभागीय समायोजनासाठी शिक्षकांना बोलाविण्यात आले. शिक्षकांचा आक्षेप होता की, दोन दिवसांपूर्वी अतिरिक्त शिक्षकांची यादी व्हॉट्सअ‍ॅपवर प्रकाशित करण्यात आली. ही यादी बघून शिक्षक समायोजन स्थळी पोहचले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या समायोजन प्रक्रियेत समायोजन स्थळावर शिक्षकांसाठी साध्या पाण्याची सुद्धा सोय करण्यात आली नव्हती. महिला शिक्षिका लहान मुलांना घेऊन प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. समायोजन प्रक्रियेत अपंगांना प्राध्यान्य असल्याने, नियमानुसार विभागीय प्रक्रियेत अपंग बसू शकत नाही, मात्र अपंग शिक्षकही प्रक्रियेत सहभागी झाले होते.विभागात ६५४ शिक्षक अतिरिक्तनागपूर विभागात खाजगी अनुदानित शाळेतील ६५४ शिक्षक अतिरिक्त ठरले आहे. तर रिक्त जागा ह्या २२७ आहे. यात वर्धा जिल्ह्यात ३७, भंडारा ५९, गोंदिया २९, नागपूर ६०, चंद्रपूर ४०, गडचिरोलीत २ जागा रिक्त आहे. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिकेच्या शाळेतील रिक्त जागेवर समायोजन केल्यास अतिरिक्त शिक्षकांची संख्या कमी होऊन शिक्षकांचे जिल्ह्यातच समायोजन होईल.प्रक्रिया स्थगित करावीविभागीय समायोजनाच्या प्रक्रियेत अनेक त्रुटी असून, ही प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष सुभाष गोतमारे, अजय भोयर, सुधीर वारकर, देवेंद्र हुलके, गोवर्धन भोंगाडे यांनी शिक्षक उपसंचालकाकडे केली.शिक्षकांना वेठीस धरण्याचा प्रकारजिल्ह्यात जागा रिक्त असताना, त्या जागेवर शिक्षकांचे समायोजन न करता, त्यांना बाहेरगावी पाठवून शिक्षकांना वेठीस धरण्याचा प्रकार शिक्षण विभाग करीत आहे. समायोजनाची प्रक्रिया नियमबाह्य राबविली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शिक्षक संघाचे विभागीय सचिव बाळा आगलावे, आशिष मोहल्ले, सतीश दामोदरे, अजहर हुसैन, जयप्रकाश तवले, अनिल राऊत, उमेश डडमल यांनी केली.

 

 

टॅग्स :Teacherशिक्षकnagpurनागपूर