शिक्षकांची हायकोर्टात धाव
By Admin | Updated: July 16, 2014 01:17 IST2014-07-16T01:17:09+5:302014-07-16T01:17:09+5:30
‘करिअर अॅडव्हान्समेंट स्कीम’चा लाभ मिळावा यासाठी नेट/सेट पदवी नसलेल्या व ६ वर्षांपेक्षा जास्त काळापासून सेवारत असलेल्या अनेक शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.

शिक्षकांची हायकोर्टात धाव
नागपूर : ‘करिअर अॅडव्हान्समेंट स्कीम’चा लाभ मिळावा यासाठी नेट/सेट पदवी नसलेल्या व ६ वर्षांपेक्षा जास्त काळापासून सेवारत असलेल्या अनेक शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.
न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांनी राज्य शासन, विद्यापीठ अनुदान आयोग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व संबंधित महाविद्यालयांना नोटीस बजावून ४ आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने १८ नोव्हेंबर २०१३ रोजी दिलेल्या अंतरिम आदेशाच्या आधारावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने २१ फेब्रुवारी २०१४, तर नागपूर खंडपीठाने ५ मार्च २०१४ रोजी याचिकाकर्त्यांसारखी परिस्थिती असलेले शिक्षक केवळ वेतनश्रेणीच्या बाबतीत ‘करिअर अॅडव्हान्समेंट स्कीम’च्या लाभासाठी पात्र असल्याचा अंतरिम आदेश दिला आहे.
आतापर्यंत सुमारे २५ याचिकांमध्ये हा अंतरिम आदेश देण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. फिरदोस मिर्झा व अॅड. अश्फाक शेख यांनी न्यायालयात आपली बाजू मांडली.(प्रतिनिधी)