नागपुरातील जरीपटक्यात शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 21:10 IST2018-09-03T21:09:09+5:302018-09-03T21:10:12+5:30
शिकवणीवर्गात येणाऱ्या विद्यार्थिनीसोबत प्रेमसंबंध निर्माण केल्यानंतर शिक्षकाने लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. नंतर लग्नास नकार दिल्यामुळे विद्यार्थिनीने त्याच्याविरुद्ध बलात्काराचा आरोप लावला. याप्रकरणी जरीपटक्यात गुन्हा दाखल झाला आहे. बलात्काराचा दुसरा गुन्हा नंदनवनमध्ये दाखल झाला.

नागपुरातील जरीपटक्यात शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिकवणीवर्गात येणाऱ्या विद्यार्थिनीसोबत प्रेमसंबंध निर्माण केल्यानंतर शिक्षकाने लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. नंतर लग्नास नकार दिल्यामुळे विद्यार्थिनीने त्याच्याविरुद्ध बलात्काराचा आरोप लावला. याप्रकरणी जरीपटक्यात गुन्हा दाखल झाला आहे. बलात्काराचा दुसरा गुन्हा नंदनवनमध्ये दाखल झाला.
आरोपी किशोर हूड (वय २९) हा अयोध्यानगरात राहतो. तो जरीपटक्यात शिकवणी वर्ग घेतो. दोन वर्षांपासून मुलगी त्याच्याकडे शिकवणीसाठी जाते. आॅगस्ट २०१७ मध्ये त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यावेळी मुलगी अल्पवयीन होती. या दोघांनी लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या. वयात आल्यानंतर लग्न करण्याचे त्यांनी ठरवले होते. दरम्यान, त्यांच्यात नियमित शारीरिक संबंध प्रस्थापित होऊ लागले. ती आता १८ वर्षांची झाली असून, काही दिवसांपासून त्यांच्यात विसंवाद निर्माण झाला. तो टाळत असल्याचे लक्षात आल्याने तिने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला. त्याने लग्नास नकार दिल्यामुळे रविवारी मुलगी जरीपटका ठाण्यात पोहचली. तिच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक मिश्रा यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. बलात्काराचा दुसरा गुन्हा नंदनवनमध्ये दाखल झाला. तक्रार करणारी युवती (वय १७) तरोडी (नंदनवन) मध्ये राहते. आरोपी भूषण रमेश इंगळे (वय २५) हा लकडगंजमध्ये राहतो. या दोघांची काही दिवसांपूर्वी फोनवरून ओळख झाल्यानंतर ते नियमित संपर्कात होते. बोलणे, भेटणे, असे प्रकार असताना ती रविवारी दुपारी ३ च्या सुमारास ती गणेशपेठ बसस्थानकावर आली. तिने फोन करून आरोपी भूषणला भेटायला बोलवले. भूषण त्याच्या दुचाकीने तेथे पोहचला. त्याने तिला आपल्या दुचाकीवर बसवले. बराच वेळ इकडेतिकडे फिरल्यानंतर आरोपीने तिला नंदनवनमधील आऊटररिंग रोडवरच्या तरोडी गावाजवळ असलेल्या एका धाब्यावर नेले. तेथे एकांत मिळताच आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. युवतीने नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.