शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी तौसिफ खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 23:29 IST

निवडणुकांदरम्यान झालेल्या गोंधळामुळे राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नागपूर लोकसभा क्षेत्रातील युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांचे निकाल शुक्रवारी घोषित करण्यात आले. अध्यक्षपदी तौसिफ खान यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी इरशाद शेख यांची निवड झाली. अगोदर मतमोजणी स्थगित ठेवण्यात आल्याने निकालांची कार्यकर्त्यांना आतुरतेने प्रतीक्षा होती.

ठळक मुद्देदिग्गजांच्या उमेदवारांना धक्का : धीरज पांडे, इरशाद शेख उपाध्यक्षपदी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकांदरम्यान झालेल्या गोंधळामुळे राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नागपूर लोकसभा क्षेत्रातील युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांचे निकाल शुक्रवारी घोषित करण्यात आले. अध्यक्षपदी तौसिफ खान यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी इरशाद शेख यांची निवड झाली. अगोदर मतमोजणी स्थगित ठेवण्यात आल्याने निकालांची कार्यकर्त्यांना आतुरतेने प्रतीक्षा होती.९ सप्टेंबरला युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीच्या प्रक्रियेंतर्गत विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान सुरू झाले. निवडणूक प्रक्रियेतून प्रदेश अध्यक्ष, प्रदेश महामंत्री, शहराध्यक्ष, महामंत्री, विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. १२५०० मतदारांपैकी ५०२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतदानादरम्यान ‘अहबाब कम्युनिटी सेंटर’ येथे बोगस मतदानाचे आरोप झाले होते. यावरुन गोंधळ झाला होता. युवक काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालणाºया कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे गुरुवारी मतमोजणी होऊ शकली नव्हती.अध्यक्षपदासाठी तौसिफ खान, धीरज पांडे यांच्यासह दहा उमेदवारांमध्ये लढत होती. तौसिफ खान यांना १४९१ मते मिळाली, तर धीरज पांडेला १०९९ मते मिळाली. तौसिफ खान हे शहर कॉंग्रेस कार्यकारिणी सदस्य बशीरभाई यांचे पुत्र आहेत. धीरज पांडे हे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या ‘एससी सेल’चे अध्यक्ष नितीन राऊत यांचे समर्थक कृष्णकुमार पांडे यांचे पुत्र आहेत. नितीन राऊत यांचे समर्थन असतानादेखील पांडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. धीरज पांडे, इरशाद शेख यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती होणार आहे.शहर महासचिवपदासाठीच्या निवडणुकीत नावेद शेखला सर्वाधिक ५४२ मते मिळाली. केतन ठाकरे व शेख अजहर यांनादेखील यश मिळाले. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या उपाध्यक्षपदावर आकाश गुजरची निवड झाली तर कविता यादव या महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवरुन निवडून आल्या.विधानसभा क्षेत्रनिहाय अध्यक्षांची निवडशहर कार्यकारिणीसोबतच विधानसभा क्षेत्रनिहाय कार्यकारिणीदेखील निवडण्यात आली. स्वप्निल ढोके ५१८ मतांसह मध्य नागपूरच्या अध्यक्षपदी निवडून आले. दक्षिण नागपुरातून बॉबी धोटे (६०५ मते), उत्तर नागपुरातून अनमोल लोणारे (४०१ मते), पूर्व नागपुरातून अक्षय घाटोळे (२१३ मते), पश्चिम नागपुरातून अखिलेश राजन (२४९ मते) व दक्षिण पश्चिममधून मंगेश बढेल निवडून आले.प्रदेशवर नागपुरातून पाचप्रदेश युवक कॉंग्रेसच्या निवडणुकांमध्ये नागपूर शहरातील पाच उमेदवारांना यश मिळाले. कुणाल राऊत उपाध्यक्षपदी निवडून आले. तर भूषण मरसकोल्हे, नेहा निकोसे महासचिवपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. रोहित खैरवार व अजित सिंग हे सचिव झाले आहेत.उत्तर नागपुरात नितीन राऊतांना धक्काशहरात युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांमध्ये शहरातील मोठ्या नेत्यांना धक्का बसला. उत्तर नागपुरात माजी मंत्री व अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या ‘एससी सेल’चे अध्यक्ष नितीन राऊत यांचे पूत्र कुणाल यांना प्रदेश उपाध्यक्षपदावर समाधान मानावे लागले. तर उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राऊत गटाच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. येथे अनमोल लोणारे यांनी बाजी मारली. लोणारे हे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांचे समर्थक आहेत. विकास ठाकरे यांचे पुत्र केतन ठाकरे हे शहर महासचिव झाले, आपल्या गटात ते दुसऱ्या

 

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक