टाटा मॅझिकच्या धडकेने दुचाकीचालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:13 IST2021-02-17T04:13:58+5:302021-02-17T04:13:58+5:30

मोहपारोडलगतची घटना उमरेड : येथून मोहपाकडे दुचाकीने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या टाटा मॅझिकची जोरदार धडक लागून दुचाकीचालक ठार ...

Tata Magic kills two-wheeler | टाटा मॅझिकच्या धडकेने दुचाकीचालक ठार

टाटा मॅझिकच्या धडकेने दुचाकीचालक ठार

मोहपारोडलगतची घटना

उमरेड : येथून मोहपाकडे दुचाकीने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या टाटा मॅझिकची जोरदार धडक लागून दुचाकीचालक ठार झाला. मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान मोहपा रोडलगत हा अपघात घडला. वर्सेल वसराम चव्हाण (४५) असे मृतकाचे नाव आहे. टाटा मॅझिकचा वाहनचालक भावसन नंदू चव्हाण (५०, लोहारा) यास अटक करण्यात आली आहे. वर्सेल चव्हाण (एम.एच.४०- बीयू- ३६४७) या दुचाकीने साहित्य खरेदी करीत आपल्या गावाला परत जात होता. अशातच समोरून येणाऱ्या टाटा मॅझिक (एम.एच.४०- एके ६८१०) या वाहनाची धडक लागली. लागलीच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वर्सेल चव्हाण यांचा मृत्यू झाला. उमरेड पोलीस ठाण्यात सदर अपघाताचा गुन्हा दाखल असून टाटा मॅझिक वाहनचालकास अटक करण्यात आली.

Web Title: Tata Magic kills two-wheeler