जायरा वसीमच्या निर्णयावर तसलीमा नासरिनने दिली ‘अशी’ दाहक प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 15:45 IST2019-07-01T15:43:49+5:302019-07-01T15:45:46+5:30

दंगल गर्ल जायरा वसीमने आपण बॉलीवूड सोडत असल्याच्या जाहीर केलेल्या निर्णयाबाबत नेटकऱ्यांमध्ये सध्या बरीच जुंपली आहे.

Taslima Nasreen gave reaction to the decision of Jaira Waseem | जायरा वसीमच्या निर्णयावर तसलीमा नासरिनने दिली ‘अशी’ दाहक प्रतिक्रिया

जायरा वसीमच्या निर्णयावर तसलीमा नासरिनने दिली ‘अशी’ दाहक प्रतिक्रिया

ठळक मुद्देनेटकऱ्यांमध्ये जायरावरून जुंपली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: दंगल गर्ल जायरा वसीमने आपण बॉलीवूड सोडत असल्याच्या जाहीर केलेल्या निर्णयाबाबत नेटकऱ्यांमध्ये सध्या बरीच जुंपली आहे. तिने हा निर्णय इस्लामधर्माची शिकवण डोळ्यासमोर ठेवून घेतला असल्याचे म्हटल्यामुळे या प्रतिक्रियांना बरीच धारही चढली आहे.
ज्येष्ठ लेखिका तसलीमा नासरीन यांनी टिष्ट्वटरवर, जायराच्या निर्णयाचे स्वागत करावे कारण तो धर्मासाठी घेतलेला निर्णय आहे, असा सूर आळवणाऱ्यांना फटकारले आहे. त्या म्हणतात, नारीद्वेष व पारंपारिकतेने भरलेल्या समाजात स्त्रीचे ब्रेन वॉश केले जाते. तिने पुरुषाच्या अधीन रहावे, अवलंबून रहावे, अशिक्षित रहावे, गुलाम असावे, भोगदासी व्हावे, मुले सांभाळणारे यंत्र बनावे असेच हा समाज अपेक्षितो. स्त्रीला स्वातंत्र्य तर नाहीच पण निवडीची संधीही नाही.
जायराच्या निर्णयावर अनेकांनी उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करताना, तिचे निर्णयस्वातंत्र्य अबाधित राखले जावे असेही म्हटले आहे.



 

 

Web Title: Taslima Nasreen gave reaction to the decision of Jaira Waseem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.