सुधारलेल्या मनोरुग्णांना अत्मनिर्भर बनविण्याचे काम अडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:08 IST2021-06-24T04:08:25+5:302021-06-24T04:08:25+5:30
नागपूर : नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयातून दुरुस्त झालेल्या मनोरुग्णांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी तयार करण्यात आलेले डे केयर सेंटर अद्यापपर्यंत सुरू झालेले ...

सुधारलेल्या मनोरुग्णांना अत्मनिर्भर बनविण्याचे काम अडले
नागपूर : नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयातून दुरुस्त झालेल्या मनोरुग्णांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी तयार करण्यात आलेले डे केयर सेंटर अद्यापपर्यंत सुरू झालेले नाही. संपूर्ण रुग्णालयाचे इलेक्ट्रिकल ऑडिट न झाल्याने हे कामही अडकले आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांमध्ये मानसिक तणाव आणि नैराश्य आले आहे. दुरूस्त झालेल्या मनोरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि रोजगार देण्यासाठी मनाेरुग्णालय परिसरतच वर्षभरापासून डे केयर सेंटर उभारण्यात आले असले तरी ते सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
भंडारा येथील रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिट यासह आवश्यक कामांची पहाणी केली जात आहे. मनाेरुग्णालयात पीडब्ल्यूडीच्या विद्युत विभाग अभियांत्रिकी शाखेच्या माध्यमातून थर्ड पार्टी ऑडिट केले जाणार आहे. यासाठी मनोरुग्णालयाला सुमारे ६ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार थर्ड पार्टी ऑडिटसाठी खाजगी एजन्सीची भागीदारी असताना ही रक्कम अधिक आहे. या ऑडिटअंतर्गत काही नवी उपकरणे आणि वायर लावले जातील. डे केयर सेंटरमध्ये हे सर्व लावलेले आहे. ऑडिट आवश्यक असले तरी खाजगी एजंसीच्या फायद्यासाठी दुरुस्त झालेल्या मनोरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या कामात मात्र अडसर निर्माण झाला आहे.
...
कोट
सुरक्षेच्या दृष्टीने इलेक्ट्रिकल ऑडिटची गरज आहे. यानंतर नवी उपकरणे लावली जातील आणि वायरिंग केली जाईल. ऑडिटनंतर एनओसी मिळेल, त्यानंतरच डे केयर सह अन्य आवश्यक कामे सुरू केली जातील. ऑडिटसाठी लागणाऱ्या शुल्कासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे.
- पुरुषाेत्म मडावी, वैद्यकीय अधीक्षक, क्षेत्रीय मनाेरुग्णालय, नागपूर
...