शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

तान्हुल्याच्या दुधासाठी रेल्वे थांबली !

By admin | Updated: May 18, 2016 03:01 IST

दूध नसल्यामुळे भुकेने स्वर्णजयंती एक्स्प्रेसमधील एक तान्हुला व्याकुळ झाला. तो भुकेने तडफडत असल्याचे पाहून त्याच्या मातेलाही अश्रू अनावर झाले.

आरपीएफ हेल्पलाईनची मदत : बल्लारशाला थांबविली स्वर्णजयंती एक्स्प्रेसनागपूर : दूध नसल्यामुळे भुकेने स्वर्णजयंती एक्स्प्रेसमधील एक तान्हुला व्याकुळ झाला. तो भुकेने तडफडत असल्याचे पाहून त्याच्या मातेलाही अश्रू अनावर झाले. तिच्यासोबत दूध नसल्यामुळे आता काय करावे, असा यक्षप्रश्न उभा झाला. तेवढ्यात तिने रेल्वेगाडीत हेल्पलाईन क्रमांक पाहिला अन् मदतीसाठी आरपीएफच्या हेल्पलाईनला दूरध्वनी केला. तिच्या फोनची त्वरित दखल घेऊन बल्लारशा रेल्वेस्थानकावर गाडी थांबवून त्या तान्हुल्याला आरपीएफने दूध उपलब्ध करुन दिले.सोमवारी रात्री नवी दिल्ली येथील रहिवासी कुलदिप पुगलिया हे आपली पत्नी एस. सुजाता आणि आपल्या सहा महिन्याच्या तान्हुल्यासह रेल्वेगाडी क्रमांक १२४०४ स्वर्णजयंती एक्स्प्रेसच्या कोच एस-४, बर्थ ३९ वरून प्रवास करीत होते. बल्लारशा रेल्वेस्थानक येण्यापूर्वी सहा महिन्याचा तान्हुला आपल्या मातेच्या कुशीत भुकेने तडफडत होता. याची जाणीव त्याच्या मातेला झाली. परंतु जवळ दूध शिल्लक नसल्यामुळे तिची चिंता आणखीनच वाढली. पुढील रेल्वेस्थानकावर दूध मिळेल की नाही, या विचाराने ती आणखीनच बेचैन झाली. तेवढ्यात तिची नजर कोचमध्ये लावलेल्या आरपीएफच्या हेल्पलाईन क्रमांकाच्या स्टिकरवर पडली. तिने त्वरित हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून आरपीएफच्या कंट्रोल रुमला आपल्या तान्हुल्याची अवस्था सांगून दूध उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. तिच्या दूरध्वनीनंतर आरपीएफची चमू कामाला लागली. रेल्वेगाडीचे पुढील स्टेशन बल्लारशा होते. आरपीएफने दिलेल्या माहितीनुसार बल्लारशा स्थानकावर दूध उपलब्ध नव्हते. आरपीएफच्या जवानांनी बाहेरून दूध आणले आणि गाडी येण्यापूर्वी ते बल्लारशा स्थानकावर हजर झाले. गाडी येताच त्यांनी या महिलेच्या कोचकडे धाव घेतली. आरपीएफचे जवान दूध घेऊन येत असल्याचे पाहताच मातेच्या चेहऱ्यावरील चिंता चुटकीसरशी नाहिशी झाली. तिने भावूक होऊन रेल्वे सुरक्षा दल आणि नागपूर कंट्रोल रुमचे आभार व्यक्त केले.