शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

तामिळनाडू, गंगाकावेरी, चेन्नई एक्स्प्रेसमध्ये पकडली दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 12:05 AM

रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी तामिळनाडु एक्स्प्रेस, गंगाकावेरी एक्स्प्रेस आणि लखनौ-चेन्नई एक्स्प्रेसमधून दारूची तस्करी करणाऱ्या एका महिलेला आणि पुरुषाला अटक करून त्यांच्याकडून २० हजार ६ रुपये किमतीच्या दारूच्या ४७९ बॉटल जप्त केल्या.

ठळक मुद्देदोघांना अटक : रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी तामिळनाडु एक्स्प्रेस, गंगाकावेरी एक्स्प्रेस आणि लखनौ-चेन्नई एक्स्प्रेसमधून दारूची तस्करी करणाऱ्या एका महिलेला आणि पुरुषाला अटक करून त्यांच्याकडून २० हजार ६ रुपये किमतीच्या दारूच्या ४७९ बॉटल जप्त केल्या.शुक्रवारी दुपारी १.५४ वाजता आरपीएफचा जवान शशिकांत गजभिये, सुषमा ढोमणे हे राज्य उत्पादन शुल्क विभागासोबत गस्त घालत होते. प्लॅटफार्म क्रमांक २ वर उभ्या असलेल्या १२६२२ तामिळनाडु एक्स्प्रेसच्या एस १ कोचमध्ये त्यांना एक महिला संशयास्पद स्थितीत आढळली. तिची चौकशी केली असता तिने समाधानकारक उत्तर दिले नाही. तिला आरपीएफ ठाण्यात आणून उपनिरीक्षक विद्याधर यादव यांच्या समोर हजर करण्यता आले. तिने आपले नाव सुनिता संजय काळे (५५) रा. महाकाली वॉर्ड, चंद्रपूर सांगितले. तिने साडीच्या आत दारूच्या ३७५० रुपये किमतीच्या ३९ बॉटल लपविल्याचे उघड झाले. दुसºया घटनेत सकाळी ११.११ वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर १६०९४ लखनौ-चेन्नई एक्स्प्रेसच्या इटारसी एण्डकडील जनरल कोचमध्ये एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत चढताना आढळली. चौकशी केली असता तिने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यास आरपीएफ ठाण्यात आणले असता आपले नाव बाळकृष्ण नागोजी नागपुरे (२३) रा. झिंगुजी वॉर्ड, भद्रावती, चंद्रपूर सांगितले. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ दारूच्या ३१०० रुपये किमतीच्या २२ बॉटल आढळल्या. तिसºया घटनेत गुरुवारी रात्री ९.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर १२६७० गंगाकावेरी एक्स्प्रेसच्या स्लिपर कोचमध्ये २ बॅग बेवारस स्थितीत आढळल्या. आजूबाजूच्या प्रवाशांनी या बॅगवर आपला हक्क सांगितला नाही. संशयाच्या आधारे बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या १० हजार ९२० रुपये किमतीच्या ३३२ बॉटल आढळल्या. गंगाकावेरी एक्स्प्रेसमध्ये इंजिन जवळील जनरल कोचमध्ये बेवारस बॅग आढळली. त्यात २२३६ रुपये किमतीच्या दारूच्या ८६ बॉटल होत्या. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द करण्यात आली.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरliquor banदारूबंदी