कोचच्या दारावर बोलत बसणे महागात पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:06 IST2021-06-28T04:06:59+5:302021-06-28T04:06:59+5:30

नागपूर : कोचच्या दारावर बसून मोबाईलवर बोलत असताना यापूर्वी अनेकांना धक्का देऊन त्यांचे मोबाईल आरोपींनी लंपास केले आहेत. शनिवारी ...

Talking at the coach door was expensive | कोचच्या दारावर बोलत बसणे महागात पडले

कोचच्या दारावर बोलत बसणे महागात पडले

नागपूर : कोचच्या दारावर बसून मोबाईलवर बोलत असताना यापूर्वी अनेकांना धक्का देऊन त्यांचे मोबाईल आरोपींनी लंपास केले आहेत. शनिवारी रात्रीही एक प्रवासी बैतुलवरून नागपूरला येताना कोचच्य दारावरून त्याचा मोबाईल लंपास करण्यात आला. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कुलदिप तापीप्रसाद सिसोदिया (३२) रा. बैतुल असे या प्रवाशाचे नाव आहे. ते बैतुल ते नागपूर असा प्रवास जनरल कोचने करीत होते. नागपूरला डी कॅबिन परिसरात गाडीचा वेग मंदावला होता. यावेळी ते जनरल कोचच्या दारावर मोबाईलवर बोलत बसले होते. रेल्वे रुळाच्या बाजूला उभ्या असलेल्या एका असामाजिक तत्वाने काठीच्या साह्याने त्यांच्या हातावर वार करून १७ हजार रुपये किमतीचा मोबाईल खाली पाडला. त्यानंतर आरोपी मोबाईल घेऊन पसार झाला. नागपूर रेल्वेस्थानकावर येताच या प्रवाशाने लोहमार्ग पोलीस ठाणे गाठुन गुन्हा दाखल केला. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास संदीप धंदर करीत आहेत.

...........

Web Title: Talking at the coach door was expensive