शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नागपूर शहर पोलीस आयुक्तांच्या बदलीची चर्चा जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:40 IST

पोलीस उपायुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची पुणे किंवा मुंबईत बदली होणार असल्याची जोरदार चर्चा पुन्हा नव्याने सुरू झाली आहे. येथील नवीन पोलीस आयुक्त म्हणून डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या नावावर गुरुवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.

ठळक मुद्देतीन अतिरिक्त महासंचालकांची नावे पुढे : दोन दिवसानंतर होणार निर्णय?

आॅनलाईन लोकमतनागपूर : पोलीस उपायुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची पुणे किंवा मुंबईत बदली होणार असल्याची जोरदार चर्चा पुन्हा नव्याने सुरू झाली आहे. येथील नवीन पोलीस आयुक्त म्हणून डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या नावावर गुरुवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.दीड वर्षांपूर्वी नागपुरात आयुक्त म्हणून बदली झालेले डॉ. व्यंकटेशम मितभाषी आणि अभ्यासू अधिकारी म्हणून लवकरच सर्वत्र ओळखीचे झाले. त्यांनी शहर पोलीस दलाचा चेहरामोहरा स्मार्ट करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. शहरात सर्वत्र सीसीटीव्ही, महिला आणि मुलींच्या मदतीसाठी भरोसा सेल, बडी कॉप्स, पोलिसांच्या प्रशिक्षणासाठी एन कॉप्स एक्सीलन्स आणि असेच अनेक उपक्रम सुरू केले. पोलिसांच्या कामगिरीचे स्वत:च आॅडिट करवून घेतले. तंत्रज्ञानाचा वापर करून कमी मनुष्यबळात विधिमंडळ अधिवेशनाच्या बंदोबस्ताचा त्यांचा प्रयोग राज्यभरात प्रशंसेचा विषय ठरला. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाच्या आधारेच नागपुरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यावर त्यांनी भर दिला. आकडे बघितले तर नागपुरातील गुन्हेगारी कमी झाल्याचेही दिसते. पोलीस आयुक्त, उपायुक्तांच्या कार्यालयासह शहरातील ३० ही पोलीस ठाण्यांचा चेहरामोहरा बदलविण्यात डॉ. व्यंकटेशम यांची भूमिका मोलाची ठरली. मात्र, अधूनमधून उफाळून येणारी गुन्हेगारी आणि त्यामुळे होणारी टीका बघता त्यांची बदली होणार असल्याचे किंबहुना डॉ. व्यंकटेशम स्वत:च आपली बदली करवून घेणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू होती. आता पुन्हा नव्याने ही चर्चा सुरू झाली आहे.नागपूरचे आयुक्तपद अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या दर्जाचे आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त तीन अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यातील एक म्हणजे डी. कनकरत्नम यांचे नाव होय. कनकरत्नम यांच्याकडे सध्या नक्षल आॅपरेशनची जबाबदारी आहे. ते नागपूरचे सहपोलीस आयुक्त राहिले आहेत. त्यामुळे त्यांना गुन्हेगारीची माहिती आहे. त्यांच्यासारखेच दुसरे नाव संजीवकुमार यांचे आहे. ते सध्या अतिरिक्त आयुक्त म्हणून सीआयडीला आहेत तर, तिसरे नाव अतिरिक्त महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचे आहे. डॉ. उपाध्याय यांनी नागपुरात विविध पदावर प्रदीर्घ कामगिरी बजावली असून, सौजन्यशील मात्र अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे.अपवादात्मक अवस्थेत अन्य अधिकाऱ्याचे नाव पुढे येऊ शकते, असा दावा वरिष्ठ सूत्रांचा आहे. अन्य अधिकाºयांच्या तुलनेत डॉ. उपाध्याय यांनाच नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात येईल,अशीही माहिती आहे.गुरुवारच्या बैठकीत निर्णय?सध्या राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. त्याचा समारोप अन् वरिष्ठांच्या बैठकीसंबंधाने गुरुवारी ११ जानेवारीला मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नागपूरच्या नवीन पोलीस आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जाते. डॉ. व्यंकटेशम यांची पुण्याला किंवा मुंबईला बदली होणार असल्याचीही वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. यासंबंधाने पोलीस आयुक्तांशी संपर्क केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाही.

टॅग्स :Policeपोलिसnagpurनागपूर